
तुझ्यात जीव रंगला
Available in Marathi
एक अशिक्षित कुस्तीपटू राणा व शाळेतील शिक्षिका अंजली यांची ही प्रेमकथा आहे. सत्तेसाठी आसुसलेली राणाची वहिनी, नंदिता त्यांच्याविरुद्ध सतत कट रचते. राणा-अंजलीतील प्रेम सर्व अडचणींवर मात करू शकेल का?
Director & Cast
TV Show Details
प्रतापरावांच्या स्वागतासाठी अंजली पोहोचते उशिरा! - तुझ्यात जीव रंगला
मंत्रीपदावर स्थित प्रतापराव गायकवाड त्यांचा लहान मुलगा सुरज (सनी)सोबत गावात येतात. सनीची पत्नी नंदिता अतिशय उद्धट असते. नंदिताची पाठराखीण म्हणून आलेल्या चंदाला गायकवाडांच्या घरातील अतिशय प्रामाणिक नोकर गोदाक्का अजिबात आवडत नाही. प्रतापरावांचा मोठा मुलगा राणा एक पेहलवान असून गावात प्रसिद्धही असतो. गावातल्या शाळेचे मुख्याध्यापक महाजन सर प्रतापरावांचे स्वागत करण्यास उशिरा आल्याने शिक्षिका अंजलीला सुनावतात. तर नंदिता अंजलीला प्रतापरावांचे स्वागत करण्यापासून रोखते.
प्रतापरावांच्या स्वागतासाठी अंजली पोहोचते उशिरा! - तुझ्यात जीव रंगला
महाजन संगतात अंजलीला नंदिताची माफी मागण्यास - तुझ्यात जीव रंगला
प्रतापरावांनी अंजलीला त्यांचे स्वागत करण्याची परवानगी दिल्याने नंदिता चिडते. महाजन अंजलीला नंदिताची माफी मागण्यास सांगतात. नंतर, महाजन व अंजलीला नंदिता बाहेर वाट बघण्यास सांगते. नंदिताने या दोघांना संपूर्ण दिवस वाट बघायला लावल्याचे कळताच प्रतापराव नंदिताला अंजलीची माफी मागण्यास सांगतात. नंदिता अंजलीची माफी मागतच तिला एक आव्हानही देते.
महाजन संगतात अंजलीला नंदिताची माफी मागण्यास - तुझ्यात जीव रंगला
प्रतापराव राणाला सांगतात लग्नाचा विचार करण्यास - तुझ्यात जीव रंगला
मद्यधुंद अवस्थेत सनी घरी येतो. प्रतापराव राणाला त्याच्या लग्नाचा विचार करण्यास सांगतात. नंदिता तिच्या झालेल्या अपमानाविषयी सांगते व सनी याविषयी प्रतापरावांशी बोलू न शकल्याने ती घर सोडायचे ठरवते. राणा त्याच्यामुळे नंदिताला त्रास झाला म्हणून तिची माफी मागतो व तिचा नेहमीच घरात आदर होईल असे वचन देतो. प्रतापरावांनी अंजलीला दिलेली सोन्याची चैन नंदिता तिला द्यावे असे राणाला सांगते.
प्रतापराव राणाला सांगतात लग्नाचा विचार करण्यास - तुझ्यात जीव रंगला
राणा टाळतो अंजलीला - तुझ्यात जीव रंगला
विद्यार्थ्यांशी थोडं सौम्य वागण्याचा सल्ला देणाऱ्या अंजलीवर महाजन सर चिडतात. ‘हिंद केसरी’ हा किताब राणाने मिळवावा म्हणून नरसिंग त्याला प्रोत्साहन देतो. राणा त्याच्या तालमीत अंजलीचा विचार करतो. काही कामानिमित्त प्रतापराव व सनी गावाबाहेर जातात. नंदिता अंजलीकडून सोन्याची चैन परत आण्याण्याची आठवण राणाला करून देते. शाळेजवळ जाताच राणा अंजलीला भेटण्याचे ठरवतो पण अंजलीने पाहताच तो तिथून पळ काढतो.
राणा टाळतो अंजलीला - तुझ्यात जीव रंगला
राणा करतो अंजलीचा पाठलाग - तुझ्यात जीव रंगला
प्रतापराव आणि सनी गावाबाहेर का गेलेत याचे कारण गोदाक्काकडून काढून घेण्यात नंदिता व चंदा अयशस्वी होतात. अंजलीकडून जोवर चैन आणत नाही तोवर काहीच न खाण्याची राणाने शपथ घेतल्याचे नंदिता गोदाक्काला सांगते. चंदा शेतात जाऊन राणाला नंदिताला दिलेल्या वचनाची आठवण करून देते. राणा अंजलीचा पाठलाग करतो व तिच्याकडे चैन मागतो. राणा चैन आणण्यासाठी अंजलीकडे जातो व चैनच्या बदल्यात तिला दोन ट्रॅक्टर भरून ऊस घेऊन जातो.
राणा करतो अंजलीचा पाठलाग - तुझ्यात जीव रंगला
अंजली ठरवते राणाने आणलेले ऊस परत करण्याचे - तुझ्यात जीव रंगला
अंजलीकडून चैन परत मिळवल्याने राणा आनंदित होतो. राणाने आणलेला ऊस अंजली तिच्या विद्यार्थ्यांना देते. कारखान्यात उसाचे दोन ट्रॅक्टर पोहोचले नसल्याचे चंदा नंदिताला सांगते. राणाने चैन देताच चंदा व नंदिता चकित होतात. अंजली राणाला त्याने आणलेले ऊस परत करण्याचे ठरवते. पुढे, बरकतकडून माहिती मिळवून अंजली राणाला भेटायला तालमीत जाते.
अंजली ठरवते राणाने आणलेले ऊस परत करण्याचे - तुझ्यात जीव रंगला
तालमीत होते राणाला शिक्षा - तुझ्यात जीव रंगला
अंजली तालमीत आल्याने राणाला शिक्षा केली जाते. अंजली राणाला तिच्या घरून ऊस घेऊन जावेत असे सांगते. त्यामुळे राणा बरकतला ते ऊस विकण्यास सांगून त्याचे पैसे अंजलीला द्यावेत असे सांगतो. अंजली शाळेतल्या मुलांसाठी संगणक विकत घेते. त्यामुळे त्याच्या उद्घाटनासाठी महाजन सर नंदिताला बोलावतात. तेव्हाच अंजली चैनच्या बदल्यात राणाने ऊस व पैसे दिल्याचे नंदिताला सांगते.
तालमीत होते राणाला शिक्षा - तुझ्यात जीव रंगला
नंदिता करते बरकतवर चोरीचा आरोप - तुझ्यात जीव रंगला
उसाचे दोन ट्रक कारखान्यावर न पोहोचल्याने नंदिता सर्व कामगारांना प्रश्न विचारते. कामगारांकडून सर्व हिशोब बरकत राणाकडे देत असल्याचे कळताच नंदिता त्याला बोलावते व त्याला मळ्यातले घर सोडून जाण्यासही सांगते. गोदाक्का नंदिताने बरकतवर चोरीचा आरोप केल्याचे सांगते. पुढे, प्रतापराव व नंतर सनी आणि राणा घरी येताच नंदिता तिच्या चुकीमुळे ट्रक कारखान्यावर पोहोचले नाहीत असे दाखवते.
नंदिता करते बरकतवर चोरीचा आरोप - तुझ्यात जीव रंगला
राणा करतो अंजलीच्या आईची मदत - तुझ्यात जीव रंगला
नंदिताने हिशोबात घोळ झाल्याची चूक स्वतःवर घेतल्याने राणा प्रतापरावांना नंदिता निर्दोष असल्याचे सांगत स्वतःची बाजू मांडतो. पुढे, तो नंदितावर हिशोब सांभाळण्याची जबाबदारी सोपवतो. बरकतला आपण घर सोडण्यास सांगितले नसल्याचे नंदिता राणाला सांगते. त्यामुळे गोदाक्का व बरकतचा नंदिताविषयी गैरसमज झाल्याचे राणा त्यांना सांगतो. राणा अंजलीच्या आईला वाटेतून घरी दळण नेण्यास मदत करतो. काही विद्यार्थी अंजलीला तिच्या घरी जातात व महाजन सरांना भेटण्यास सांगतात.
राणा करतो अंजलीच्या आईची मदत - तुझ्यात जीव रंगला
अंजली विद्यार्थ्यांसह येत राणाच्या शेतात - तुझ्यात जीव रंगला
राणाला चिडवणाऱ्या मुलांना नंदिता त्याचे कारण विचारते. तेव्हा मुले अंजलीने राणाला मिठाई खायला दिल्याचे सांगतात. राणा त्याची चिंता त्याचा बैल साहेबरावजवळ व्यक्त करत असल्याचे प्रतापरावांना सांगतो. राणाला आपण लग्न करू देणार नाही असे नंदिता चंदाला सांगते. अंजलीचे विद्यार्थी तिला त्यांच्या एका मित्राच्या शेतावर यावे अशी विनंती करतात. पुढे, मुलं आणि अंजली राणाच्या शेतावर जातात मात्र अंजलीला पाहताच राणा शेतातल्या विहिरीत उडी मारतो.
अंजली विद्यार्थ्यांसह येत राणाच्या शेतात - तुझ्यात जीव रंगला
अंजली व तिच्या विद्यार्थ्यांना राणा दाखवतो शेत - तुझ्यात जीव रंगला
बरकत अंजलीला विहिरीपासून लांब उभे राहावे असे सांगतो. प्रतापराव राणाच्या लग्नाची जबाबदारी नंदितावर सोपवतात. नंदिता शिवाप्पा नावाच्या गुंडाला अंजलीकडून उसाच्या बदल्यात पैसे उकळावेत असे सांगते. राणाच्या शेतात अंजलीला तिची मैत्रीण रेणू भेटते. अंजली व तिच्या विद्यार्थ्यांना राणा शेत दाखवायचे ठरवतो व तेव्हाच अंजलीच्या हातातील ब्रेसलेट राणाच्या शर्ट मध्ये अडकते. दरम्यान, शिवाप्पा अंजलीच्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांकडे एक लाख रुपयांची मागणी करतो.
अंजली व तिच्या विद्यार्थ्यांना राणा दाखवतो शेत - तुझ्यात जीव रंगला
अंजली ठरवते राणापासून दूर राहायचे - तुझ्यात जीव रंगला
न्याहरी केल्यावर अंजली व तिचे विद्यार्थी शेतातून निघतात. राणा प्रेमात असल्याचे बरकत त्याला सांगतो. घरी येताच अंजली तिच्या आईला राणाच्या शेतात गेल्याचे सांगते. मात्र तेव्हाच तिची आई राणाने भेट दिलेल्या उसाच्या बदल्यात पैसे मागण्यासाठी घरी गुंड पाठवल्याचे सांगते. त्यामुळे अंजली राणापासून दूर राहायचे ठरवते व ती आणि तिचे बाबा कर्ज काढून राणाचे पैसे चुकवायचे ठरवतात. पुढे, राणाचे तालमीत लक्ष लागत नाही.
अंजली ठरवते राणापासून दूर राहायचे - तुझ्यात जीव रंगला
अंजली राणाचे पैसे परत करायचे ठरवते - तुझ्यात जीव रंगला
राणा काही न खाता घरातून निघाल्याने नंदिताला आश्चर्य वाटते. अंजलीच्या ब्रेसलेटचा आवाज कानात घुमत असल्याचे राणा बरकतला सांगतो. राणा अंजलीच्या घरी गेला असता दाराला कुलूप दिसते. अंजली कर्ज घेऊन राणाला त्याचे पैसे परत करण्याचे ठरवते. अंजलीच्या घरी शिवाप्पा दिसताच राणा चिडतो. अंजलीमुळे राणाचे तालमीत लक्ष नसल्याचा आरोप करणाऱ्या नरसिंगला अंजली भेटते. नंतर, शाळेजवळ राणा एका मुलाजवळ अंजलीचे ब्रेसलेट देत तिला ते देण्यास सांगतो.
अंजली राणाचे पैसे परत करायचे ठरवते - तुझ्यात जीव रंगला
नंदिता शिवाप्पाला सांगते अंजलीकडून पैसे उकळण्यास - तुझ्यात जीव रंगला
राणाने घरी गुंड पाठवल्याचे अंजली रेणूला सांगते. अंजली राणाला शाळेजवळ पाहते मात्र तो तिला न भेटताच निघून जातो. पुढे, अंजली राणाला शेतात जाऊन भेटते व त्याला एक लाख रुपये देते. कोणीतरी अंजलीकडे पैशांची मागणी केल्याचे बरकत राणाला सांगतो. नंदिता स्वतःचे नाव कुठेच न आणता अंजलीकडून पैसे आणण्याचा आदेश शिवाप्पाला देते. पुढे, नंदिता महाजन सरांना फोन करून शाळेतील संगणक घरी आणून ठेवावा असे सांगते. नंतर, शिवाप्पाला घरी आलेले पाहून अंजलीची आई घाबरते.
नंदिता शिवाप्पाला सांगते अंजलीकडून पैसे उकळण्यास - तुझ्यात जीव रंगला
राणा करतो शिवाप्पाला मारहाण - तुझ्यात जीव रंगला
महाजन सर गायकवाडांच्या घरी येतात. नंदिता त्यांनी आणलेला संगणक घरी ठेवून घेत तो गायकवाडांच्या पैशानेच आणला असल्याचे सांगते. अंजली घरी येताच तिची आई तिला शिवाप्पा परत येऊन गेल्याचे सांगते. ते ऐकून अंजली राणाला घरी गुंड पाठवण्यावरून सुनावते. अंजलीची आई राणासमोर त्या गुंडाचे वर्णन करते. त्यानंतर, अंजलीच्या घरच्यांना धमकावल्याने राणा शिवाप्पाला मारहाण करतो.
राणा करतो शिवाप्पाला मारहाण - तुझ्यात जीव रंगला
राणा ठरवतो अंजलीशी बोलण्याचे - तुझ्यात जीव रंगला
राणा शिवाप्पासोबत अंजलीच्या घरी येतो व त्याला अंजलीची माफी मागायला सांगत संगणक तिच्या घरात ठेवण्यास सांगतो. राणा हा घडलेला प्रसंग बरकतला सांगतो. पुढे, अंजलीचे ब्रेसलेट हरवल्याने ती आपल्यावर रागावली असल्याचे राणाला कळते व तो तिच्याशी बोलायचे ठरवतो. पुढे, अंजली राणाने संगणक दिल्याचे महाजन सरांना सांगते. नंतर, अंजलीने राणाला शाळेजवळ पाहताच तो लपतो व तिथून पळून जातो.
राणा ठरवतो अंजलीशी बोलण्याचे - तुझ्यात जीव रंगला
राणा घेणार अंजलीला नवे ब्रेसलेट - तुझ्यात जीव रंगला
महाजन सर अंजलीला राणानेच शाळेला संगणक दिल्याचे त्याच्या कडून लिहून आणण्यास सांगतात. अंजली तालमीजवळ जाते मात्र नरसिंग तिला आत न येण्याची विनंती करतो. अंजली तिचे ब्रेसलेट घ्यायला आल्याचे वाटल्याने राणा एक नवे ब्रेसलेट विकत घ्यायचे ठरवतो. नंतर अंजली तिच्या येण्याचे प्रयोजन राणाला सांगते.
राणा घेणार अंजलीला नवे ब्रेसलेट - तुझ्यात जीव रंगला
राणा लिहितो अंजलीला पत्र - तुझ्यात जीव रंगला
अंजलीचे विद्यार्थी राणाला अंजलीने सांगितलेले पत्र लिहिण्यास मदत करतात. पुढे,राणा आणि बरकत अंजलीच्या घरी ते पत्र द्यायला जातात. राणाचे लग्न ठरवण्यासाठी काही पाहुणे घरी येणार असल्याचे प्रतापराव राणाला सांगतात. प्रतापराव राणाच्या लग्नाची सर्व सूत्र नंदिताच्या हाती देतात. दरवाज्यात राणाचे पत्र पाहून अंजलीचे बाबा तिला ते नेऊन देतात.
राणा लिहितो अंजलीला पत्र - तुझ्यात जीव रंगला
कुटुंबीयांची काळजी घेण्याचे नंदिताचे ढोंग - तुझ्यात जीव रंगला
राणा येत्या वर्षात नक्की लग्न करण्याचे वचन गोदाक्काला देतो. नंदिता राणाला लग्न करावे असे सांगते मात्र त्याचवेळी ते कसे चुकीचे आहे याविषयीही सांगते. राणाविषयी वाटणारी चिंता प्रतापराव त्यांच्या पत्नीच्या फोटोपुढे व्यक्त करतात. राणाच्या लग्नाविषयी वाटणारी उत्सुकता सनी त्याला सांगतो. लग्नाविषयी नंदिताने काढलेले उद्गार राणाला आठवल्याने तो रात्री घराबाहेर पडतो. नंदिता सुरज समोर घरच्यांची काळजी घेत असल्याचा आव आणते.
कुटुंबीयांची काळजी घेण्याचे नंदिताचे ढोंग - तुझ्यात जीव रंगला
शेतात अंजली व राणा येतात समोरासमोर - तुझ्यात जीव रंगला
राणा घरातून गायब असल्याचे गोदाक्का प्रतापरावांना सांगते. प्रतापराव सनीला तालमीत राणाला शोधण्यास सांगतात. राणाने दिलेल्या पत्रावर त्याची सही लागेल असे महाजन सर अंजलीला सांगतात. त्यामुळे अंजली राणा कुठे असेल याची चौकशी तिच्या विद्यार्थ्यांकडे करते. प्रतापरावांचे पाहुणे वानखेडे घरी येतात. शेतात लपलेला राणा बरकतला भेटतो. अंजलीही शेतावर येते व राणाची चौकशी करते. पुढे, शेतात अंजली व राणा एकमेकांच्या समोर येतात.
शेतात अंजली व राणा येतात समोरासमोर - तुझ्यात जीव रंगला
प्रतापराव राणाला विचारतात अंजलीविषयी - तुझ्यात जीव रंगला
राणाला भेटून अंजली त्याने दिलेल्या पत्रावर त्याची स्वाक्षरी मागते. प्रतापरावांच्या घरी आलेल्या पाहुण्यांना राणाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न नंदिता करते. पुढे, शेतात नंदिता-सुरज व प्रतापराव येताच ते राणाला अंजलीसोबत पाहतात. घरी आलेले पाहुणे निघून गेल्याचे नंदिनी राणाला सांगते तर प्रतापराव राणाला अंजलीविषयी विचारतात. राणाला लग्न करायचे नसल्याचे बरकत अंजलीला सांगतो.
प्रतापराव राणाला विचारतात अंजलीविषयी - तुझ्यात जीव रंगला
लग्नासाठी राणाचे मन वळविण्याचा प्रतापरावांचा प्रयत्न - तुझ्यात जीव रंगला
शेतात राणाला शोधताना घडलेला प्रसंग नंदिता चंदाला सांगते. प्रतापराव राणाने लग्न करावे यासाठी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करतात. अंजलीला रणाची पत्रावर सही घेण्यास सांगितल्याचे महाजन प्रतापरावांना सांगतात. राणा लगन करण्याचे वचन प्रतापरावांना देतो. तितक्यात अंजलीही राणाची स्वाक्षरी घेण्यास गायवाडांच्या घरी येते. शाळेत संगणक आणल्याने प्रतापराव अंजलीचे कौतुक करतात. ते ऐकून प्रतापराव अंजलीच्या वागण्याने प्रभावित झाले असावेत असे चंदा नंदिताला सांगते.
लग्नासाठी राणाचे मन वळविण्याचा प्रतापरावांचा प्रयत्न - तुझ्यात जीव रंगला
नंदिता नाराज असल्याचे चंदा सांगते प्रतापरावांना - तुझ्यात जीव रंगला
वानखेडे आल्यावर राणाचे घरी नसणे यावरून प्रतापराव त्याच्यावर रागावले आहेत असे नंदिता राणाला सांगते. नंदिता जेवणार चंदा गोदाक्काला सांगते. अंजलीचे विद्यार्थी तिला शेतात लपण्याचे कारण विचारतात. नंदिता नाराज असल्याचे चंदा प्रतापरावांन सांगते. नंदिता प्रतापरावांना राणाच्या लग्नाची जबाबदारी तीच घेईल असे सांगते. दुसरीकडे, अंजली शेतात जाऊन राणाची भेट घेते व त्याने त्याच्या मित्रांना शिक्षित होण्यासाठी प्रोत्साहित करावे असे सांगते.
नंदिता नाराज असल्याचे चंदा सांगते प्रतापरावांना - तुझ्यात जीव रंगला
ब्रेसलेट द्यायला शामराव जातो राणाच्या शेतात - तुझ्यात जीव रंगला
लग्नाविषयी वाटणारी चिंता राणा साहेबरावकडे व्यक्त करतो. गोदाक्का राणाला त्याच्या आवडत्या मुलीशी लग्न करण्यास सांगते. नंदिता प्रतापरावांनी राणाच्या लग्नाची जबाबदारी तिच्यावर दिल्याचे सनीला सांगते. पुढे. शामराव सोनार गायकवाडांच्या घरी येतो व तेव्हा त्याने राणाविषयी केलेला प्रश्न ऐकताच नंदिताला एक संशय येतो. रेणू एक ब्रेसलेट अंजलीला भेट देते. शामराव राणाला ब्रेसलेट द्यायला शेतात जातो. नंतर, राणा हे ब्रेसलेट दिल्यावर अंजलीशी बोलणार नसल्याचे बरकतला सांगतो.
ब्रेसलेट द्यायला शामराव जातो राणाच्या शेतात - तुझ्यात जीव रंगला
राणाला मुलींचे फोटो दाखवण्याचा नंदिताचा प्रयत्न - तुझ्यात जीव रंगला
रेणू आणि अंजली राणाला शाळेबाहेर बघतात. राणाकडून अंजलीला ब्रेसलेट देणे राहून जाते. अंजली जवळ असताना आपण खूप अस्वस्थ होत असल्याचे राणा बरकतला सांगतो. राणाला नेमकं काय बोलायचं असेल याचा अंजली विचार करते तर राणा तिला दुसऱ्या दिवशी ब्रेसलेट द्यायचे ठरवतो. राणा व अंजलीचे कुटुंबीय दिवाळी साजरी करतात. नंदिता राणासाठी योग्य स्थळ निवडेन असे प्रतापरावांना सांगते व त्यानंतर राणाला विविध मुलींचे फोटो दाखवण्याचा प्रयत्न करते.
राणाला मुलींचे फोटो दाखवण्याचा नंदिताचा प्रयत्न - तुझ्यात जीव रंगला
Details About तुझ्यात जीव रंगला TV Show :
| Movie Released Date | 3 Oct 2016 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

