
माझा होशील ना
Available in Marathi
श्रीमंत घरात वाढलेली सई हुशार व प्रामाणिक आदित्यच्या प्रेमात पडते. विविध अडथळ्यांवर मात करत दोघांचे लग्न होते पण सईला आदित्यच्या कुटुंबाशी जुळवून घेता येईल का ?
Director & Cast
TV Show Details
सईचे वाक्य ऐकून आदित्यला येते चीड - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, अप्पांच्या विसरभोळेपणामुळे अडचणीत सापडलेल्या सई व नैना त्यांच्या घरातून पळ काढतात. पुढे, सईच्या तोंडून एक वाक्य ऐकून आदित्यला चिडतो. नंतर, वडिलांवरील रागाने भरधाव गाडी चालवताना सईच्या गाडीचा अपघात होतो. गॅरेजमध्ये पुन्हा सई दिसताच आदित्य तिला एक टोमणा मारतो.
सईचे वाक्य ऐकून आदित्यला येते चीड - माझा होशील ना
मामांचा राग घालवण्यासाठी आदित्य करतो एक युक्ती - माझा होशील ना
माझा होशील ना या मालिकेच्या या भागात, आदित्यने आपली माफी मागावी अशी अट सई पिंट्यासमोर ठेवते. घरी येताच सर्व मामा रागावलेत हे कळताच आदित्य एक युक्ती करतो आणि त्यांचा राग घालवतो. पुढे, सईच्या सांगण्यावरून नैना आदित्यला फोन करते. तेव्हा त्याचे बोलणे ऐकून मात्र सईचा संताप होतो.
मामांचा राग घालवण्यासाठी आदित्य करतो एक युक्ती - माझा होशील ना
गॅरेजमध्ये गाडी न दिसल्याने सई चिंतीत - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, नैनाचा सतत फोन येत असल्याने सगळे मामा आदित्यला प्रश्न विचारतात. दुसऱ्या दिवशी आदित्यपासून त्याची खरी ओळख लपवण्यासाठी त्याला घरातच ठेवून सर्व मामा व अप्पा एके ठिकाणी जातात. पुढे, गॅरेजमध्ये गाडी न दिसल्याने सई खूप चिंतीत होते.
गॅरेजमध्ये गाडी न दिसल्याने सई चिंतीत - माझा होशील ना
कंपनीतील घोळ पाहून अप्पा बजावतात मल्होत्राला - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, सईची गाडी परत करायला गेलेल्या आदित्यचा शशिकांत अपमान करतो पण आदित्य त्याला सडेतोड उत्तर देतो. सर्व मामा आणि अप्पा आदित्यच्या कंपनीतील हिशोबात घोळ पाहून मल्होत्राला बजावतात. पुढे, शशिकांतकडून आदित्यच्या वागण्याविषयी ऐकून चिडलेली सई आदित्यला फोन करते.
कंपनीतील घोळ पाहून अप्पा बजावतात मल्होत्राला - माझा होशील ना
सई जाते आदित्यच्या घरी - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्य एके ठिकाणी नोकरीसाठी मुलाखत देण्यास जातो. सई आदित्यच्या घरी जाऊन पिंट्याला धमकावते आणि तिच्या वडिलांनी दिलेले पैसे परत मागते. आदित्य मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला बघून आश्चर्यचकित होतो. पुढे, पिंट्याने विजेचे बिल न भरल्याने त्याचे सर्व भाऊ त्याला खडसावतात.
सई जाते आदित्यच्या घरी - माझा होशील ना
पैसे मिळवण्यासाठी सई विकते लोणचे – माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, सर्व मामा मिळून वीजेचे बिल न भरल्याने पिंट्याला शिक्षा करतात. पैसे मिळविण्यासाठी सई लोणची विकायला जाते. मात्र सामान विकले जात नसल्याने ती हताश होते. नंतर, सईने बराच वेळ ताटकळत उभं ठेवल्याने आदित्य चिडतो.
पैसे मिळवण्यासाठी सई विकते लोणचे – माझा होशील ना
आदित्य जातो सईच्या घरी - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, सईच्या घरी जाऊन आदित्य तिच्याकडे त्याची उधारी मागतो. आदित्यला घरात पाहून सईचे वडिल थक्क होतात. नोकरीच्या मुलाखतीसाठी आदित्यचे मामा त्याला मदत करतात. पुढे, सईचे वडिल, शशिकांत, तिला पैसे मिळवून देण्यासाठी एक योजना आखतात.
आदित्य जातो सईच्या घरी - माझा होशील ना
बेशुद्ध पडलेल्या सईला आदित्य नेतो दवाखान्यात – माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, मुलाखतीसाठी निघालेला आदित्य वाटेतल्या सईच्या दुकानात जातो व तिच्या वस्तू तिच्याच वडिलांचे कर्मचारी विकत घेत असल्याचं तिला सांगतो. पुढे, थकव्यामुळे बेशुद्ध पडलेल्या सईला आदित्य दवाखान्यात घेऊन जातो. या गोंधळामुळे आदित्यला मुलाखतीला पोहोचण्यास उशीर होतो.
बेशुद्ध पडलेल्या सईला आदित्य नेतो दवाखान्यात – माझा होशील ना
सईला भेटण्यास आदित्यचा नकार - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यला इस्पितळात बघून सईचे वडील चिडतात व त्याचा अपमान करतात. घरी परतताच, आदित्यचे मामा त्याला मुलाखतीला न जाण्याचे कारण विचारतात. पुढे, आदित्य सईला भेटण्यास नकार देतो. त्यामुळे सई त्याला भेटण्यासाठी एक योजना आखते.
सईला भेटण्यास आदित्यचा नकार - माझा होशील ना
सई मागते आदित्यची माफी - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यला भेटता यावं यासाठी सई एक योजना आखते. सई आदित्यच्या गॅरेजमध्ये पोहोचते पण तो तिच्याशी बोलण्यास नकार देतो. पुढे, सई त्याची माफी मागते व तेव्हाच तिथे तिच्या वडिलांना पाहून तिथून पळ काढते. नंतर, सईच्या वडिलांच्या प्रश्नांना आदित्य खोटी उत्तरे देतो.
सई मागते आदित्यची माफी - माझा होशील ना
स्कार्फ परत करण्यासाठी आदित्यची सईला अट - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यला सईचा स्कार्फ सापडतो. दरम्यान, स्कार्फ सापडत नसल्याने सई खूप चिंतीत होते. आदित्य तो स्कार्फ कपाटात लपवतो आणि त्याच्या मामांना कपाट उघडण्यापासून रोखतो. पुढे, स्कार्फ परत करण्यासाठी आदित्य सईसमोर एक अट ठेवतो.
स्कार्फ परत करण्यासाठी आदित्यची सईला अट - माझा होशील ना
स्कार्फ देण्यास आदित्यचा सईला नकार - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, स्कार्फ हरवल्याने रडवेली झालेली सई तिच्या आईवर चिडते. दुसऱ्या दिवशी सकाळी स्कार्फवरून सर्व मामा आदित्यला प्रश्न विचारतात. दरम्यान, आदित्यचा रुमाल सापडत नसल्याने सई एक तोडगा काढते. पुढे, आदित्यने स्कार्फ देण्यास नकार देताच सई त्याच्यावर वैतागते.
स्कार्फ देण्यास आदित्यचा सईला नकार - माझा होशील ना
स्कार्फ मिळाल्याने सई आनंदते - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या पुढील १४व्या भागात, मुलाखतीला निघालेल्या आदित्यला सई देते शुभेच्छा! मात्र तिकडे कंपनीत मल्होत्राच्या डोक्यात शिजतोय वेगळाच डाव! पूर्ण भाग बघा फक्त zee5वर.
स्कार्फ मिळाल्याने सई आनंदते - माझा होशील ना
मल्होत्रा घेतो आदित्यची मुलाखत - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यला त्याच्या मुलाखतीसाठी सई शुभेच्छा देते. आदित्य मुलाखतीसाठी येताच मल्होत्रा त्याला खूप वेळ थांबवून ठेवतो. पुढे, तो आदित्यची फार कसून प्रश्न विचारत मुलाखत घेतो. नंतर एक बातमी देण्यासाठी आदित्य तातडीने सईला संपर्क करण्याचा प्रयत्न करतो.
मल्होत्रा घेतो आदित्यची मुलाखत - माझा होशील ना
आदित्य देतो सईला त्याचा नंबर - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यला नोकरी मिळाल्याचा आनंद सर्व मामा मिळून साजरा करतात. आदित्य आणि सई दोघेही एकमेकांशी बोलणं होत नसल्याने अस्वस्थ होऊन नैनाला फोन करतात पण नैना दोघांशीही खोटं बोलते. पुढे, अचानक दोघांचे बोलणे होते आणि आदित्य सईला त्याचा नंबर देतो.
आदित्य देतो सईला त्याचा नंबर - माझा होशील ना
आदित्य सईला शिकवतो कॉफी बनवायला - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, संपर्क क्रमांक देण्याच्या निमित्ताने सई-आदित्यमध्ये संवाद सुरु होतो. रात्री, सर्व मामांमध्ये कॅरमचा डाव रंगलेला असतानाच आदित्य सईला मेसेजमधून कॉफी बनवायला शिकवतो. आदित्यला चॅटिंग करताना पाहून सर्व मामा त्याच्याकडे गमतीने पाहतात व मुद्दाम त्याला कॅरम खेळायला बसवतात.
आदित्य सईला शिकवतो कॉफी बनवायला - माझा होशील ना
अप्पा घरात नसल्याने सगळे होतात चिंतीत - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, सर्व मामा मिळून आदित्यच्या वागण्याचा विचार करतात. आदित्यचा मेसेज वाचून सई त्याला चटकन फोन करते पण रात्री तिचा फोन आल्याने आदित्य गडबडतो. आदित्य नोकरीला जाणार म्हणून सगळे मामा त्याला एकेक भेटवस्तू देतात. अचानक अप्पा घरात नसल्याचे कळताच मात्र सगळे चिंतीत होतात.
अप्पा घरात नसल्याने सगळे होतात चिंतीत - माझा होशील ना
मामा की सई यांच्या निवडीत आदित्य पडतो पेचात! - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, अप्पा सापडत नसल्याने सर्व चिंतीत असतानाच ते समोर येऊन उभे राहतात. पुढे, सर्व मामा मिळून आदित्यसाठी खास जेवणाचा बेत आखतात. तेवढ्यात रात्रीच्या जेवणाच्या ठरलेल्या योजनेनुसार सई आदित्यच्या घराबाहेर येऊन उभी राहते. त्यामुळे आदित्य मात्र मोठ्या पेचात अडकतो.
मामा की सई यांच्या निवडीत आदित्य पडतो पेचात! - माझा होशील ना
हॉटेलात जाऊन आदित्य पडतो संकटात - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यने अचानक घाबाहेर जाण्याचे कारण सांगताच सगळ्या मामांना शंका येते. ते त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात पण तरीही आदित्य मामांना चुकवून सई व नैनाला भेटतो. पुढे, सई ज्या हॉटेलात घेऊन जाते ते पाहून आदित्यला संकटात सापडल्यासारखे होते.
हॉटेलात जाऊन आदित्य पडतो संकटात - माझा होशील ना
नैना तिच्या मनातली गोष्ट सांगते सईला - माझा होशील ना
माझा होशील न मालिकेच्या या भागात, हॉटेलमध्ये एक ठराविक टेबल आवडण्याचे कारण सई आदित्यला सांगते. पुढे, नैनाच्या बॅगेत आदित्यचा रुमाल पाहताच सई तिला जाब विचारते व त्यामुळे नैना तिच्या मनातील गोष्ट सईला सांगते. दरम्यान, बिलाच्या रकमेच्या अंदाजाने आदित्य चिंतीत असतो.
नैना तिच्या मनातली गोष्ट सांगते सईला - माझा होशील ना
सईने मागवलेल्या पदार्थांमुळे आदित्यला फुटतो घाम - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, सईने हॉटेलमध्ये मागवलेल्या पदार्थांची संख्या बघून आदित्यला घाम फुटतो. दादामामा आदित्यसोबत जेवण्यासाठी घरी त्याची वाट बघतो आणि त्याला फोन लावतो. पुढे, घरी जायला घाईने निघालेल्या आदित्यकडे सई नैनाला घरी सोडण्याचा आग्रह करते.
सईने मागवलेल्या पदार्थांमुळे आदित्यला फुटतो घाम - माझा होशील ना
नैनाला भेटण्याविषयी आदित्य घालतो सईला एक अट - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, नैना बोलता बोलता सई हॉटेलमध्ये गरजेपेक्षा जास्त पदार्थ का मागवते याचे कारण आदित्यला सांगते. पुढे, दादामामा जेवला नसल्याने आदित्य पुन्हा जेवायला बसतो. नंतर, नैनाला भेटण्याविषयी आदित्य सईला एक अट घालतो. घरी सर्वांचे बोलणे ऐकून आदित्य मनोमन एक निश्चय करतो.
नैनाला भेटण्याविषयी आदित्य घालतो सईला एक अट - माझा होशील ना
नैनाने दिलेल्या भेटवस्तूंमुळे आदित्य अडचणीत - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यच्या नोकरीचा पहिला दिवस असल्याने घरात सगळे त्याला आशीर्वाद देतात व दादामामा एक भेट देतो. पिंट्यामामा सोबत गाडीने आदित्य त्याच्या ऑफिसला जातो. पुढे, सई व नैना आदित्यला ऑफिसजवळ भेटायला येतात. मात्र तेव्हा नैनाने दिलेल्या भेटवस्तूंनी आदित्य मात्र अडचणीत येतो.
नैनाने दिलेल्या भेटवस्तूंमुळे आदित्य अडचणीत - माझा होशील ना
सईचा मेसेज न आल्याने आदित्य अस्वस्थ - माझा होशील ना
आदित्यच्या नोकरीचा पहिला दिवस म्हणून घरात सर्वजण खूपच उत्साहात तयारी करतात. सईच्या मोबाईलवर आदित्यचा मेसेज आलेला पाहताच तिचे आई-बाबा चिंतीत होतात. पिंट्या रागात दादामामावर एक आरोप करतो तेव्हाच आदित्य तिथे येतो. आपल्या नोकरीचा पहिला दिवस असूनही सईने मेसेज न केल्याने आदित्य मात्र अस्वस्थ होतो.
सईचा मेसेज न आल्याने आदित्य अस्वस्थ - माझा होशील ना
आदित्यच्या नोकरीचा पहिला दिवस - माझा होशील ना
आदित्यच्या नोकरीचा पहिला दिवस असल्याने सई त्याला भेटते. तर नयना त्याच्यासाठी खूप भेटवस्तू घेऊन येते. नंतर, आदित्य व सई दोघांच्याही घरात चाललेल्या लग्नाच्या विषयावरून दोघे गमतीत चर्चा करतात. पहिल्याच दिवशी, आदित्यला धडा शिकवण्यासाठी मल्होत्रा त्याला गोडाऊनमधले काम देतात.
आदित्यच्या नोकरीचा पहिला दिवस - माझा होशील ना
Details About माझा होशील ना TV Show :
| Movie Released Date | 27 Feb 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

