
ती परत आलीये
Available in Marathi
नऊ मित्र एका निर्जन घरात एकत्र भेटण्याचे ठरवतात. मात्र त्यातील एका मित्राची कपटी योजना त्या सर्वांच्या जीवावर बेतणार आहे याविषयी सर्वच अनभिज्ञ आहेत.
Director & Cast
TV Show Details
नीलांबरीचे नाव ऐकताच सर्वच होतात भयभीत
आईच्या आग्रहामुळे सायली रोहिणीसोबत रिसॉर्टवर जाते. रिसॉर्टचा रखवालदार तांडेल दहा वर्षांनी एकत्रित जमलेल्या मित्रांना त्यांची मैत्रीण नीलांबरीविषयी सांगतो. तिचे नाव ऐकताच सर्वच भयभीत होतात.
नीलांबरीचे नाव ऐकताच सर्वच होतात भयभीत
सर्वजण करतात तांडेलजवळ चौकशी
सर्वजण त्यांच्यासाठी रिसॉर्ट कुणी राखीव केले याची चौकशी तांडेलजवळ करतात. सर्वजण मद्य घेत एकमेकांविषयी जाणून घेतात. एकमेकांजवळ एकमेकांचे नंबर नसतानाही त्यांना इथे कुणी बोलावले या विचारात सर्व पडतात.
सर्वजण करतात तांडेलजवळ चौकशी
तांडेल-अभयचे बोलणे ऐकतो सतेज
रिसॉर्टमधून निघण्याची तयारी करणाऱ्या सायलीला विकी समजावण्याचा प्रयत्न करतो. रिसॉर्टमधू निघालेल्या रोहिणी-सायली व विकीला थांबवण्याचा प्रयत्न हणमंत करतो. पुढे, तांडेल व अभयचे बोलणे सतेज ऐकतो.
तांडेल-अभयचे बोलणे ऐकतो सतेज
मित्रांमधील निम्मेजण निघतात रिसॉर्टमधून
तांडेलने सुचवल्याप्रमाणे विकी व हणमंत चारचाकीचे दार उघडतात. नंतर, हणमंत-विकी किल्लीशिवाय चारचाकी सुरु करतात. रोहिणी, टिक्या, विकी व सायली रिसॉर्टमधून निघातात. मात्र त्यांची गाडी रस्त्यातच बंद पडते.
मित्रांमधील निम्मेजण निघतात रिसॉर्टमधून
जंगलात गाडी बंद पडल्याने सर्वच चिंतीत
तांडेलेने सांगितलेली गोष्ट ऐकून सतेज त्याच्यावर चिडतो. जंगलात गाडी बंद पडल्याने सर्वच चिंतीत होतात. पुढे, सतेज-अभय सायलीसह इतरांना रिसॉर्टवर सोडतात व विकीला आणायला ते परत जंगलात जातात.
जंगलात गाडी बंद पडल्याने सर्वच चिंतीत
अभयवर होतो चाकूचा वार
रोहिणी सायलीला तिच्या बाळाविषयीचे एक धक्कादायक सत्य सांगते. पुढे, विकी सापडत नसल्याने चिंतीत असलेली सायली विकीला पाहताच त्याला मिठी मारते. रात्री, पार्टीदरम्यान अचानक अभयवर चाकूचा वार होतो.
अभयवर होतो चाकूचा वार
तांडेल देतो पोलिसांना बोलावण्याची धमकी
अभयच्या खुनाविषयी सर्वांवर संशय घेत तांडेल पोलिसांना बोलावण्याची धमकी देतो. अभयला बघून रोहिणीला धक्का बसतो. आरोप-प्रत्यारोप करत सर्वजण सत्याला प्रश्न विचारतात. पुढे, पोलीस आल्याचे कळताच सगळे घाबरतात.
तांडेल देतो पोलिसांना बोलावण्याची धमकी
लोखंडेला दिसेल का अभयचा मृतदेह?
रिसॉर्टजवळ बंद पडलेली गाडी बघून पोलीस लोखंडे व पवार रिसॉर्टवर येतात. दरम्यान, तांडेलला लाच देऊन सर्वजण अभयचा मृतदेह लपवतात. पुढे, अभयचा मृतदेह लपवलेल्या ठिकाणीच लोखंडे गेल्याने सर्वजण चिंतीत होतात.
लोखंडेला दिसेल का अभयचा मृतदेह?
सर्वजण पुरणार अभयचा मृतदेह
पोलिसांना सर्व काही खरे सांगण्याचे टिक्या सर्वांना सांगतो. मात्र त्याचे काहीही न ऐकता सर्वजण तांडेलने सांगितल्याप्रमाणे अभयचा मृतदेह पुरण्याचे ठरवतात. दुःखाने रडणाऱ्या रोहिणीला अनुजा व सायली समजावतात.
सर्वजण पुरणार अभयचा मृतदेह
सर्वजण घेतात अभयच्या सामानाची झडती
घाबरलेल्या मँडीला पाहून सर्वच विचारात पडतात. अभयच्या कुटुंबीयांविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण त्याच्या सामानाची झडती घेतात. पुढे, अभयविषयीची एक गोष्ट तांडेलने सांगताच सर्वांच्या चेहऱ्याचा रंग उडतो.
सर्वजण घेतात अभयच्या सामानाची झडती
सर्वजण घेतात अभयच्या मृतदेहाचा शोध
अभयचा मृतदेह गायब झाल्याने सर्वच चिंतीत होतात. दोन दोन जणांच्या जोड्या करून सर्व अभयच्या मृतदेहाचा शोध घेतात. पुढे, सायली व सतेज अभयचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी जातात व तेथेच त्यांना लोखंडे दिसतो.
सर्वजण घेतात अभयच्या मृतदेहाचा शोध
लोखंडे घेतो सर्वांच्या बॅगेची झडती
सायली-सतेजला जंगलातील खड्ड्याविषयी लोखंडे विचारतो. दरम्यान, त्याला एका पडद्यावर रक्ताचे डाग दिसतात. पुढे, सर्वांच्या बॅगेची झडती घेऊन तो पुन्हा सर्वांना चौकशीसाठी बोलावतो.
लोखंडे घेतो सर्वांच्या बॅगेची झडती
टिक्या-मॅन्डीला जंगलात येतो भयंकर अनुभव
सायलीच्या घरी रोहिणीला शोधत तिचा नवरा येतो. टिक्या-मॅन्डीला पोलीस मारहाण करतात. ते दोघे जंगलातील भयावह घटना मित्रांना सांगतात. सायलीची आई व रोहिणीचा नवरा त्या दोघी बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगतात.
टिक्या-मॅन्डीला जंगलात येतो भयंकर अनुभव
सायली पडते एका खोल खड्ड्यात
टिक्याला सर्वजण छतावर चढवतात. आईशी संपर्क होत नसल्याने अस्वस्थ सायली रेंजच्या शोधात रिसॉर्टच्या बाहेर पडते. खोल खड्ड्यात पडलेल्या सायलीला विकी बाहेर काढतो. तेवढ्यातच लोखंडे त्यांच्यावर बंदूक उगारतो.
सायली पडते एका खोल खड्ड्यात
लोखंडे अनुजाला घेऊन जातो पोलीस ठाण्यात
बंदुकीच्या आवाजाने सर्वजण चिंतीत होतात. सर्वांनी घरी संपर्क करण्याची विनंती करताच लोखंडे एकट्या अनुजाला पोलीस ठाण्यात घेऊन जातो. लोखंडेला बोलवायला पोलीस ठाण्यातून पोलीस आल्याने सगळ्यांना धक्का बसतो.
लोखंडे अनुजाला घेऊन जातो पोलीस ठाण्यात
वायरलेस फोनवरील संदेश ऐकतात सर्वजण
मद्यधुंद अवस्थेतील अनुजासह आलेला लोखंडे सर्वांना एक इशारा देतो. सर्वजण अनुजाला तिने लोखंडेला काय सांगितले याविषयी विचारतात. अनुजाच्या बॅगेत सापडलेल्या वायरलेस फोनवरील संदेश ऐकून सर्वांनाच धक्का बसतो.
वायरलेस फोनवरील संदेश ऐकतात सर्वजण
तांडेलला खिडकीत दिसते एक भीतीदायक आकृती
रिसॉर्ट सोडून जाणाऱ्या तांडेलला सर्वजण रोखतात. वायरलेस बंद पडल्याने सगळे त्याचे सेल शोधतात. पोलिसांनी तांडेलला वायरलेसबद्दल विचारताच खिडकीबाहेरील भीतीदायक आकृती पाहून त्याला धक्का बसतो.
तांडेलला खिडकीत दिसते एक भीतीदायक आकृती
सतेजला मिळतो स्विमिंग पूलमध्ये वायरलेस
सर्वजण स्वयंपाकघरातून आलेल्या वायरलेसच्या आवाजाविषयी तांडेलला विचारतात. टिक्या-अनुजा रोहिणीला तिच्या एका जुन्या सवयीविषयी विचारतात. सर्वजण क्रिकेट खेळत असतानाच सतेजला स्विमिंग पूलमध्ये वायरलेस सापडतो.
सतेजला मिळतो स्विमिंग पूलमध्ये वायरलेस
मॅन्डीला दिसते नीलांबरी
मॅन्डीची बहीण त्याच्या मानसिक आजाराविषयी पोलिसांना सांगते. तांडेल व रिसॉर्टचा मालक यांच्यातील बोलणे मॅन्डी ऐकतो. मॅन्डीच्या जुन्या सवयीविषयी सर्वजण चर्चा करतात. मॅन्डीला नीलांबरी दिसल्याने तो घाबरतो.
मॅन्डीला दिसते नीलांबरी
सतेज पडतो टाकीवरून खाली
रात्री वेगळ्याच भाषेत बोलणाऱ्यांचा आवाज आल्याने सायली खोलीबाहेर येते. विकीच्या खोलीतून एक भयावह आकृती तिला बघते. मॅन्डी नीलांबरीशी बोलत असल्याचे सर्वांना कळते. टाकीवर भयानक आकृती पाहून सतेज खाली पडतो.
सतेज पडतो टाकीवरून खाली
हणमंत होतो अचानक गायब
भयानक दिसणाऱ्या व्यक्तीने ढकलल्याचे सतेज सर्वांना सांगतो. मॅन्डी तांडेलकडे नीलांबरीसाठी अन्न मागतो. सतेजला कोणी ढकलले हे शोधण्यासाठी विकी-हणमंत जातात. विकी मचाणावर चढलेला असतानाच हणमंत गायब होतो.
हणमंत होतो अचानक गायब
विकी घेतो तांडेलवर संशय
सतेज सायलीसमोर अंग दुखण्याचे नाटक करतो. हणम्या त्याला दिसलेल्या भयावह आकृतीविषयी विकीला सांगतो. विकीच्या तांडेलवरच्या संशयामुळे हणम्या तांडेलच्या सामानाची झडती घेतो. घाबरलेल्या सतेजला सायली धीर देते.
विकी घेतो तांडेलवर संशय
सायली भेटणार नीलांबरीला
सतेज आजारपणाचे नाटक करत असल्याचे लक्षात येताच विकी त्याला बजावतो. नीलांबरीसोबत भेट घालून देण्याचे सायली मॅन्डीला सांगते. पुढे, मॅन्डीसोबत गेलेली सायली समोर उभी असलेली भयावह आकृती पाहून घाबरते.
सायली भेटणार नीलांबरीला
सायली सांगते तिच्याविषयीचे सत्य
सायलीच्या भीतीमागचे कारण कळताच विकी त्याविषयी कोणालाही काहीच सांगू नये असे तिला सांगतो. त्यावरून सतेज व विकीमध्ये वाद होतो. सर्वांनी प्रश्नांचा भडिमार केल्याने सायली तिच्याविषयीचे सत्य सांगते.
सायली सांगते तिच्याविषयीचे सत्य
सायलीला भेटायला येते एक व्यक्ती
सायली नीलांबरीला भेटायला जाणार असल्याने सतेज सर्वांना काही सूचना देतो. सर्वजण रात्री जंगलात जातात व सायलीला भेटायला येणाऱ्या व्यक्तीची वाट बघतात. पुढे, ती व्यक्ती येताच सतेज तिच्यावर वार करतो.
सायलीला भेटायला येते एक व्यक्ती
Details About ती परत आलीये TV Show :
| Movie Released Date | 15 Aug 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

