
सत्यवान-सावित्री
Available in Marathi
खऱ्या प्रेमाची शक्ती दाखविणारी सत्यवान-सावित्री यांची कथा! धैर्यशील सावित्री तिच्या प्रेमासाठी संघर्ष करते व मृत्यूच्या विळख्यातून आपल्या पतीला वाचवते.
Director & Cast
TV Show Details
Satyavan-Savitri - जून 12, 2022 - एपिसोड
An epic saga that defines the power of true love and shows how a resilient Savitri fights for her love and brings her husband, Satyavan, back from the clutches of death.
Satyavan-Savitri - जून 12, 2022 - एपिसोड
यमदूत सावित्रीला सांगतो एक गोष्ट
रानात निघालेल्या सत्यवानाला त्याच्या रक्षणाचे सावित्री वचन देते. पुढे, सत्यवानाला दंश करण्यासाठी आलेल्या नागराजाला सावित्री विनवणी करते. नंतर, यमदूताचे बोलणे ऐकून सावित्रीला धक्का बसतो.
यमदूत सावित्रीला सांगतो एक गोष्ट
सावित्री करते यमराजांना एक विनंती
सत्यवानाचे प्राण नेणाऱ्या यमराजांना रोखत सावित्री त्यांना एक विनंती करते. अनेक दिव्य पार करत सर्वस्व पणाला लावणाऱ्या सावित्रीविषयी त्यांना आश्चर्य वाटते. काळ गोठवून ते याविषयी ब्रह्मदेवाला विचारतात.
सावित्री करते यमराजांना एक विनंती
सत्यवान-सावित्रीच्या कथेला होतो प्रारंभ
ब्रह्मदेव यमराजांना सत्यवान-सावित्रीच्या जन्मापासूनच्या कथेस प्रारंभ करतात. शाल्व नगरीचा राजा दुमत्स्येन व महाराणी येणाऱ्या बाळासाठी स्वप्ने पाहतात. मात्र त्याचा भाऊ उग्रसेन त्यांच्या वधाचा कट रचतो.
सत्यवान-सावित्रीच्या कथेला होतो प्रारंभ
महाराणी देते सत्यवानला जन्म
उग्रसेनने हल्ला केल्याने दुमत्स्येनला धक्का बसतो. महालातून पळ काढत जंगलातील एका झोपडीत महाराणी सत्यवानला जन्म देते. दुमत्स्येन सत्यवानला पंचमहाभूतांच्या स्वाधीन करत त्याच्या भविष्याविषयी विधान करतो.
महाराणी देते सत्यवानला जन्म
राजमाता रेणुका देतात देवाला ताकीद
मद्र देशाचा राजा अश्वपतीला अठरा वर्षांनी अपत्य होत असल्याने प्रजा महाराणीसाठी प्रार्थना करते. राजपुत्रच व्हावा यासाठी राजमाता रेणुका देवाला ताकीद देतात. प्रसूतीवेदनेतील महाराणीलाही त्या बजावतात.
राजमाता रेणुका देतात देवाला ताकीद
महाराणी देते सावित्रीला जन्म
महाराणी मनातील भावना अश्वपतीकडे व्यक्त करते. सावित्रीला जन्म देऊन महाराणी तिचे प्राण सोडते. अश्वपतीला अखेरचा प्रणाम करणाऱ्या निर्मलाचा जीव सावित्रीमुळे वाचतो. अश्वपती तिला सावित्रीचे दायित्व देतो.
महाराणी देते सावित्रीला जन्म
पुरोहित रेणुकाला सुचवतात एक उपाय
निर्मला रडणाऱ्या सावित्रीला रेणुकाकडे घेऊन जाते व तिला सावित्रीला जवळ घेण्याची विनंती करते. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून दुमत्स्येन सावध होतो. पुढे, पुरोहिताने सुचवलेला उपाय ऐकून रेणुका खूश होते.
पुरोहित रेणुकाला सुचवतात एक उपाय
रेणुका करते अश्वपतीची भावनिक कोंडी
उग्रसेनच्या सैन्यापासून बचाव करण्यासाठी दुमत्स्येन महाराणी व सत्यवानसह झोपडीत लपतो. महाराणी दुमत्स्येनकडून एक वचन घेते. अश्वपतीने दुसऱ्या लग्नाला नकार देताच रेणुका त्याची भावनिक कोंडी करते.
रेणुका करते अश्वपतीची भावनिक कोंडी
मोरोबा सुचवतो रेणुकाला दक्षसेनाचे स्थळ
रेणुकाने निमंत्रित केलेल्या उपवर कन्यांची अश्वपती एक वधूपरीक्षा घेतो. सावित्रीच्या रडण्याने रेणुका संतप्त होते. तेव्हाच दक्षवर्तच्या दक्षसेना या राजकन्येचे स्थळ मोरोबा तिला सुचवतो.
मोरोबा सुचवतो रेणुकाला दक्षसेनाचे स्थळ
सावित्रीच्या रडण्याने अश्वपती होतो अस्वस्थ
दुमत्स्येनच्या पत्नीला गुप्तहेर समजून अश्वपतीचे सैन्य तिचा पाठलाग करतात. सावित्रीच्या रडण्याने अश्वपती अस्वस्थ होतो. वाघीणीने सत्यवानाला दूध पाजल्याचे समजल्यावर आदिवासी दुमत्स्येनला प्रश्न करतात.
सावित्रीच्या रडण्याने अश्वपती होतो अस्वस्थ
दुमत्स्येनचा रानदेवाच्या कसोटीसाठी होकार
दुमत्स्येन रानदेवाच्या कसोटीसाठी सर्वांना होकार देतो. रेणुका सावित्रीचे पाचवीचे पूजन होईल असे अश्वपतीला बजावते. कसोटीसाठी सत्यवानाला एका खड्ड्यात ठेवले जाते तर अश्वपती सावित्रीला दालनात एकटेच सोडतो.
दुमत्स्येनचा रानदेवाच्या कसोटीसाठी होकार
सटवाई सांगते सावित्रीचे प्राक्तन
रानदेवाच्या कसोटीदरम्यान चिंतीत झालेल्या दुमत्स्येनच्या पत्नीला तो आश्वस्त करतो. पुढे, सावित्रीच्या दालनातून हसण्याचा आवाज येताच अश्वपती तिथे जातो. नंतर,सटवाई सावित्रीचे प्राक्तन अश्वपतीला सांगते.
सटवाई सांगते सावित्रीचे प्राक्तन
दक्षसेनेची अट मान्य करते रेणुका
रडणाऱ्या सावित्रीला अश्वपती शांत करण्याचा प्रयत्न करतो. दक्षसेनेचे स्वागत करत रेणुका तिला एक गोष्ट बजावते. दरम्यान, दक्षसेनेची अट रेणुका मान्य करते. दक्षसेनेचा भाऊ, दक्षबाहू अश्वपतीला एक इशारा देतो.
दक्षसेनेची अट मान्य करते रेणुका
अश्वपतीवर होतो मोहिनी विद्येचा प्रयोग
दक्षबाहू सावित्रीचा जीव घेण्यात अपयशी ठरतो. दक्षसेना सावित्रीच्या दिव्यशक्तींविषयी विश्वंभट्टला विचारते. पुढे, अश्वपतीवर मोहिनी विद्येचा प्रयोग करून दक्षसेना त्याला एक गोष्ट करण्यास सांगते.
अश्वपतीवर होतो मोहिनी विद्येचा प्रयोग
अमात्य उगारतो सावित्रीवर तलवार
विवाह विधी सुरु असतानाच अश्वपती सावित्रीसाठी अस्वस्थ होतो. तो सावित्रीला शोधायला निघणार इतक्यातच दक्षसेना त्याला रोखते. प्रधान उग्रसेनला डुरक्याविषयी सांगतो. अमात्य सावित्री व निर्मलावर तलवार उगारतो.
अमात्य उगारतो सावित्रीवर तलवार
डुरक्या घेतो सत्यवानला ताब्यात
लाकडी हत्तीच्या मदतीने डुरक्या सत्यवानला जवळ बोलावत त्याला ताब्यात घेतो. रडणाऱ्या सावित्रीसाठी अश्वपती लग्न विधी अर्धवट सोडून जातो. त्यामुळे रेणुका सावित्रीबाबत एका व्यक्तीला एक आदेश देते.
डुरक्या घेतो सत्यवानला ताब्यात
आऊला रानात सापडते सावित्री
सत्यवान घरात न दिसल्याने दुमत्स्येन-आऊ चिंतीत होतात. गृहप्रवेशावेळी सावित्रीला शोधण्यास निघालेल्या अश्वपतीला दक्षसेना संमोहित करते. आऊ रानातील लोकांसह सत्यवानाचा शोध घेतानाच त्यांना सावित्री सापडते.
आऊला रानात सापडते सावित्री
अश्वपती होतो सावित्रीसाठी वेडापिसा
सावित्री राजकन्या असल्याचे दुमत्स्येन सर्वांना सांगतो. भानावर आलेला अश्वपती सावित्रीसाठी वेडापिसा होतो. निर्मलाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा आदेश रेणुका देते. विश्वंभट्ट निर्मलाची खिल्ली उडवतो.
अश्वपती होतो सावित्रीसाठी वेडापिसा
डुरक्या पळवतो सावित्रीला
सावित्रीला सत्यवान समजून डुरक्या तिला कुटीतून पळवतो. अश्वपतीला सावित्रीचे भास होतात व तो एक निश्चय करतो. सावित्री गायब झाल्याने दुमत्स्येनसह सर्वच चिंतीत होतात. पुढे, अश्वपती देवीकडे एक कौल मागतो.
डुरक्या पळवतो सावित्रीला
अश्वपती करतो एक प्रतिज्ञा
सटवाईने केलेली आकाशवाणी ऐकून डुरक्या घाबरतो. देवीचा कौल पाहून अश्वपती आनंदित होतो. निर्मलाला मृत्यूदंड देणार तेवढ्यात अश्वपती सावित्रीला घेऊन येतो. अश्वपती एक प्रतिज्ञा करत सैन्याला एक आदेश देतो.
अश्वपती करतो एक प्रतिज्ञा
सावित्री विचारते रेणुकाविषयी
सावित्रीच्या नवव्या जन्मदिनी तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी अश्वपती जीवाचा आटापिटा करतो. शाल्व राजामुळे रान सोडून जाणाऱ्या जांभळ्या-करवंद्याला सत्यवान रोखतो. सावित्री अश्वपतीला रेणुकाविषयी विचारते.
सावित्री विचारते रेणुकाविषयी
अश्वपती समजावतो सावित्रीला
मायोची समजूत काढत सत्यवान तिला रान सोडण्यापासून रोखतो. सत्यवानने शाल्वाने बांधलेली भिंत ओलांडण्याचा विचार करताच आऊ त्याला ओरडते. तर, सावित्रीने रानात जाण्याचा हट्ट करताच अश्वपती तिला समजावतो.
अश्वपती समजावतो सावित्रीला
सावित्री निघते रानात जाण्यास
सत्यवान शस्त्र बनवून शाल्वाची भिंत तोडण्यास जाण्यासाठी एक युक्ती करतो. दरम्यान, मनोरंजनाच्या कार्यक्रमात सावित्रीचे मन रमत नाही. ती माळ्याची मुलगी सुरुंगीच्या मदतीने वेषांतर करून रानात जाण्यास निघते.
सावित्री निघते रानात जाण्यास
सत्यवान-सावित्री ठरवतात एक गोष्ट
राजवाड्यातील रक्षकांपासून लपत सावित्री तर, डोंगर-दऱ्या पार करत सत्यवान भिंतीपाशी येऊन पोहोचतात. सत्यवानच्या चिंतेने आऊला भोवळ येते. भिंतीपलीकडून संवाद करत सत्यवान-सावित्री भिंत पाडण्याचे ठरवतात.
सत्यवान-सावित्री ठरवतात एक गोष्ट
लोकमान्य
गुलामगिरीत अडकलेल्या देशबांधवांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना एकत्र आणण्यासाठी झटणारे जहाल भारतीय क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांचा असाधारण प्रवास दाखवणारा कार्यक्रम!
लोकमान्य
स्वराज्यरक्षक संभाजी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवत व त्यांची शिकवण जपत शंभूराजे मुघलांपासून स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी लढतात. या युद्धात शंभूराजेंचे एकनिष्ठ प्रयत्न जिंकतील की मुघलांचे कपट?
स्वराज्यरक्षक संभाजी
जय मल्हार
Jai Malhar is a Marathi mythological epic based on the life of Khandoba , the reincarnation of Lord Shiva. The show is about Khandobas courage, magnanimity and prowess.
जय मल्हार
सत्यवान-सावित्री
खऱ्या प्रेमाची शक्ती दाखविणारी सत्यवान-सावित्री यांची कथा! धैर्यशील सावित्री तिच्या प्रेमासाठी संघर्ष करते व मृत्यूच्या विळख्यातून आपल्या पतीला वाचवते.
सत्यवान-सावित्री
Details About सत्यवान-सावित्री TV Show :
| Movie Released Date | 12 Jun 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

