
बस बाई बस
Available in Marathi
एका बसमध्ये आलेल्या विविध सिनेकलाकारांशी गप्पा मारत त्यांची कधीही न ऐकलेली बाजू सांगणारा मनोरंजनात्मक कार्यक्रम! या कार्यक्रमातून सुबोध भावे प्रेक्षकांना घडवणार एक अनोखी सफर!
Director & Cast
TV Show Details
खासदार सुप्रिया सुळे यांची खास उपस्थिती
सुबोध भावे खासदार सुप्रिया सुळे यांचे स्वागत करतो. सुबोधने विचारलेल्या प्रश्नांवर सुप्रिया त्यांचे मत स्पष्टपणे मांडतात. बसमध्ये उपस्थित महिलांच्या मजेशीर प्रश्नांनाही त्या हसत-खेळत उत्तरे देतात.
खासदार सुप्रिया सुळे यांची खास उपस्थिती
अमृता खानविलकर सांगते मजेशीर किस्से
सुबोध भावे व महिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना अमृता खानविलकर मजेशीर किस्से सांगते. सुबोध अमृतासोबत काही खेळ खेळतो. मंचावर उपस्थित अमृता सुभाष तिच्या 'सास बहू आचार प्रा.लि' या मालिकेविषयी सांगते.
अमृता खानविलकर सांगते मजेशीर किस्से
अमृता फडणवीस यांची उपस्थिती
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याशी सुबोध संवाद साधतो. अमृता यांचे भाऊ गौरव रानडे यांनाही सुबोध प्रश्न विचारतो. काही जण अमृतासोबतचे काही अनुभव सांगतात.
अमृता फडणवीस यांची उपस्थिती
मेधा मांजरेकरांचा बसमधून प्रवास
मेधा मांजरेकर यांचे सुबोध बसमध्ये स्वागत करतो. पुढे, 'दे धक्का ३'ची टीम त्यांच्या सिनेमाविषयी व भूमिकांविषयी सांगते. नीना कुलकर्णी व सुनील बर्वे त्यांच्या मेधाविषयीच्या भावना चित्रफितीतून सांगतात.
मेधा मांजरेकरांचा बसमधून प्रवास
प्रितम मुंडे सांगतात पंकजा यांच्याविषयी
महाराष्ट्राविषयी व मुंबईविषयी पंकजा मुंडे त्यांचे विचार मांडतात. बसमधील प्रवासी महिला पंकजा यांच्याकडे काही मजेशीर मागण्या करतात. खासदार डॉ. प्रितम मुंडे त्यांच्या व पंकजा यांच्या नात्याविषयी सांगतात.
प्रितम मुंडे सांगतात पंकजा यांच्याविषयी
सुबोध साधतो क्रांती रेडकरशी संवाद
सुबोध व महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देताना क्रांती रेडकर विविध किस्से सांगते. भरत जाधव यांच्या हस्ते क्रांतीला एक पुरस्कार दिला जातो. मंचावर उपस्थित दीपा परब 'तू चाल पुढं' मालिकेविषयी सांगते.
सुबोध साधतो क्रांती रेडकरशी संवाद
पूजा सावंत सांगते चित्रीकरणाची एक आठवण
बसमध्ये सुबोध पूजा सावंतचे स्वागत करतो. पूजा एका हिंदी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानची एक आठवण सांगते. सुबोध पूजासोबत विविध खेळ खेळतो. पुढे, पूजा तिच्या 'दगडी चाळ २' सिनेमाविषयी सांगते.
पूजा सावंत सांगते चित्रीकरणाची एक आठवण
बसमधून ऋता दुर्गुळे करते प्रवास
सुबोधच्या प्रश्नांना ऋता दुर्गुळे दिलखुलास उत्तरे देते. ऋताच्या सासूबाई, मुग्धा शाह व ऋता त्यांच्या नात्याविषयी सांगतात. सुबोध ऋतासोबत काही खेळ खेळतो. ऋता दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या फोटोशी बोलते.
बसमधून ऋता दुर्गुळे करते प्रवास
किशोरीताई सांगतात बाळासाहेबांची एक आठवण
बसमध्ये सुबोध माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांचे स्वागत करतो. सुबोध व महिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना किशोरीताई त्यांची मते स्पष्टपणे मांडतात. किशोरीताई बाळासाहेब ठाकरेंविषयीची एक आठवण सांगतात.
किशोरीताई सांगतात बाळासाहेबांची एक आठवण
सुरेखाताई पुणेकर होतात भावुक
सुबोध लावणीसम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांचे बसमध्ये स्वागत करतो. सहप्रवासी महिलेने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ताई भावुक होतात. त्यांनी गायलेल्या उत्स्फूर्त लावण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढते.
सुरेखाताई पुणेकर होतात भावुक
अमृता सुभाषसोबत रंगतात गप्पा
प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाषचे सुबोध स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अमृता तिच्या ‘ती फुलराणी’ या नाटकातील एक गाणे सादर करते. अमृता गप्पांमध्ये तिच्या कारकिर्दीतील विविध किस्से सांगते.
अमृता सुभाषसोबत रंगतात गप्पा
सई ताम्हणकरशी मनमोकळा संवाद
सई ताम्हणकरचे व्यक्तिमत्व सुबोध भावे गप्पांमधून प्रेक्षकांसमोर उलगडतो. सहप्रवाश्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सई तिचे काही गमतीशीर किस्से व सवयी सांगते. सर्व खेळांमध्ये सई उत्साहाने भाग घेते.
सई ताम्हणकरशी मनमोकळा संवाद
उषा नाडकर्णी सांगतात मजेशीर किस्से
उषा नाडकर्णी म्हणजेच आऊंशी गप्पा मारत सुबोध त्यांच्याविषयी जाणून घेतो. महिलांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आऊ विविध मजेशीर किस्से सांगतात. सुशांत सिंग राजपूतच्या फोटोशी संवाद साधताना आऊ भावुक होतात.
उषा नाडकर्णी सांगतात मजेशीर किस्से
श्रेया बुगडेसोबत दिलखुलास संवाद
अभिनेत्री श्रेया बुगडेशी सुबोध संवाद साधतो. बालपण व तिचे करियर याविषयी दिलखुलास बोलत ती बरेच किस्से सांगते. तिच्या सवयींमुळे घडलेल्या विविध गमती सांगत खेळ खेळतानाही ती सर्वांचे मनोरंजन करते.
श्रेया बुगडेसोबत दिलखुलास संवाद
सोनाली कुलकर्णीसोबत मनमोकळा संवाद
सोनाली कुलकर्णीशी सुबोध संवाद साधतो. प्रवासाची आवड ते अभिनयाचा प्रवास या सर्वाबद्दल सोनाली व्यक्त होते. तिला दिलेले नृत्याचे आव्हान ती रंजकरित्या पार पाडते. एका सहप्रवासीचा फोटो पाहून तिला रडू कोसळते.
सोनाली कुलकर्णीसोबत मनमोकळा संवाद
रिंकू देते प्रश्नांची मनमोकळी उत्तरे
सुबोध बसमध्ये रिंकू राजगुरूचे स्वागत करतो. रिंकू सुबोधच्या व सहप्रवासी महिलांच्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरे देते व विविध खेळही खेळते. पुढे, सहप्रवासी म्हणून ती आकाश ठोसरच्या फोटोशी संवाद साधते.
रिंकू देते प्रश्नांची मनमोकळी उत्तरे
विशाखा सुभेदार सांगते तिचा संघर्ष
विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदारशी सुबोध संवाद साधतो. तिच्या संघर्षाविषयी व गमतीशीर आवडीविषयी जाणून घेत सुबोध तिला एक मजेशीर आव्हान देतो. पुढे, सहप्रवासी महिलांशी विशाखा दिलखुलास गप्पा मारते.
विशाखा सुभेदार सांगते तिचा संघर्ष
गप्पांमधून उलगडते प्रियाचे व्यक्तिमत्व
बसमध्ये प्रिया बापटचे स्वागत करून सुबोध गप्पांमधून तिचे व्यक्तिमत्व उलगडतो. महिला सहप्रवाश्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना प्रिया तिची काही मते ठामपणे मांडते. पुढे, सुबोध प्रियासोबत विविध खेळ खेळतो.
गप्पांमधून उलगडते प्रियाचे व्यक्तिमत्व
वडिलांच्या आठवणीने गौरी होते भावुक
सुबोध बसमध्ये श्री गौरी सावंतचे स्वागत करतो. सुबोध व सहप्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरे देताना गौरी तिची मते ठामपणे मांडते. पुढे, वडिलांच्या छायाचित्राशी संवाद साधताना गौरी भावुक होते.
वडिलांच्या आठवणीने गौरी होते भावुक
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत गप्पा
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे सुबोध स्वागत करतो. तिचा आजवरचा प्रवास व तिने घेतलेल्या भूमिकांविषयी तो गप्पांमधून जाणून घेतो. विविध खेळांत सहभागी होत ती सर्व प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे देते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत गप्पा
शुभांगी गोखले देतात आठवणींना उजाळा
अभिनेत्री शुभांगी गोखले यांचे सुबोध स्वागत करतो. त्यांचे वडील व पती, मोहन गोखलेंच्या आठवणींना त्या उजाळा देतात. विविध भूमिकांचे किस्से सांगितल्यावर आपल्या भावाच्या फोटोशी बोलताना त्या भावूक होतात.
शुभांगी गोखले देतात आठवणींना उजाळा
प्रार्थना बेहेरेसोबत मनमोकळ्या गप्पा
प्रार्थना बेहेरेसोबत रंजक खेळ खेळत सुबोध तिचे बालपण व करियर याविषयी जाणून घेतो. सहप्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ती तिच्या सवयींविषयी सांगते. पुढे, एका मित्राविषयीच्या भावना ती व्यक्त करते.
प्रार्थना बेहेरेसोबत मनमोकळ्या गप्पा
अभिनेत्री काजल काटेसोबत सुबोधचा संवाद
प्रार्थना तिच्या सहप्रवाशांच्या फोटोशी संवाद साधते. सुबोध तिची सहकलाकार काजल काटेचे स्वागत करतो. प्रार्थना व काजल मिळून नृत्याचा एक खेळ खेळतात. सुबोध काजलशी गप्पा मारत तिचा आजवरचा प्रवास जाणून घेतो.
अभिनेत्री काजल काटेसोबत सुबोधचा संवाद
सायली संजीव व शरद केळकरसोबत संवाद
अभिनेत्री सायली संजीवचे सुबोध स्वागत करतो. विविध खेळ खेळतच गप्पांमधून सुबोध तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल जाणून घेतो. पुढे, तो ‘हर हर महादेव’ या आगामी मराठी चित्रपटातील शरद केळकरशीही तो संवाद साधतो.
सायली संजीव व शरद केळकरसोबत संवाद
सायली संजीव व हार्दिक जोशीसोबत गप्पा
सायली संजीवने केलेल्या भूमिका व तिचा परदेश प्रवास याविषयी सुबोध जाणून घेतो. हार्दिक जोशी व सायली सुबोधच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे देतात. पुढे,सायली आपल्या वडिलांच्या फोटोशी बोलताना भावूक होते.
सायली संजीव व हार्दिक जोशीसोबत गप्पा
Details About बस बाई बस TV Show :
| Movie Released Date | 29 Jul 2022 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|

