‘एकच फाईट वातावरण टाईट’ हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, अंकुर वाढवे व इतर थुकरटवाडीकरांसोबतच विशाखा सुभेदार, प्रियदर्शन जाधव हे सर्व विनोदी कलाकार काही सुप्रसिद्ध पात्र आपल्यासमोर सादर करणार आहेत. विविध लोकप्रिय मराठी व हिंदी चित्रपट अगदी अनोख्या आणि विनोदी अंदाजात पाहताना आपल्या सर्वांचेच मनोरंजन होणार आहे हे नक्की!