
शुभ श्रावणी
Available in Marathi
श्रावणीच्या ऐश्वर्याच्या मागे प्रेमाची आणि वडिलांची स्वीकृती मिळवण्याची इच्छा दडलेली आहे. शुभच्या साध्या जीवनाशी आलेला तिचा संबंध संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे जाणारा बंध निर्माण करतो.
Director & Cast
TV Show Details
विश्वंभर पत्रकारांसमोर उगारतो श्रावणीवर हात
शुभच्या मदतीने श्रावणी मध्यरात्री पूजा करते. विश्वंभर त्याचा भाऊ, पृथ्वीसमोर अलकनंदाची (नंदाक्का) स्तुती करतो तर, ती त्याच्या फोटोसमोर द्वेष करते. पत्रकारांसमोर विश्वंभर श्रावणीच्या कानाखाली मारतो.
विश्वंभर पत्रकारांसमोर उगारतो श्रावणीवर हात
श्रावणी करते वेगळ्याच विषयाचा अभ्यास
शुभने कल्पना केलेला प्रसंग घडू नये यासाठी तो श्रावणीच्या युक्तीत अडथळा आणतो. ती परीक्षेसाठी वेगळ्याच विषयाचा अभ्यास करून गेल्याने चिंतित होते. घरी तिला बघायला पाहुणे येणार असल्याने तिची चिडचिड होते.
श्रावणी करते वेगळ्याच विषयाचा अभ्यास
मोक्षाच्या लग्नात श्रावणीमुळे विघ्न
शुभच्या घरमालकाची मुलगी, स्विटी तिच्या कुटुंबीयांच्या नकळत शुभच्या आईला भाडे परत देते. श्रावणी गैरसमजाने तिची आतेबहीण, मोक्षाला बघायला आलेल्या पाहुण्यांचे कान भरते व हे विश्वंभरला कळते.
मोक्षाच्या लग्नात श्रावणीमुळे विघ्न
संतप्त विश्वंभर सुनावतो श्रावणीला
संतप्त विश्वंभर आणि नंदाक्का श्रावणीला सुनावत संताप व्यक्त करतात. दुखावलेली श्रावणी शुभला ऐकवत तिची खंत त्याच्यासमोर मांडते. तिने तिच्या आईवरुन प्रश्न विचारताच तिची काकू, अपर्णा चिंतित होते.
संतप्त विश्वंभर सुनावतो श्रावणीला
विश्वंभरला अपघातापासून वाचवतो शुभ
श्रावणीमुळे विश्वंभरसोबत अपघात घडतो व शुभ त्याला वाचवतो. शुभची बहीण, शोभाचा नवरा हुंड्याचे पैसे मागायला त्याच्या सासरी येतो. नंदाक्का घर सोडून जाण्याचे नाटक करत विश्वंभरला श्रावणीविरुद्ध भडकावते.
विश्वंभरला अपघातापासून वाचवतो शुभ
लग्नावरुन श्रावणी व्यक्त करते संताप
श्रावणीच्या व स्विटीच्या गाडीची टक्कर होऊन त्यांच्यात वाद होतो. परीक्षा संपल्याने आनंदलेली श्रावणी शुभसमोर लग्नाविषयी संताप व्यक्त करते. पुढे, ती भिकाऱ्यांना पैसे देते पण त्यांचे आशीर्वाद ऐकून चिडते.
लग्नावरुन श्रावणी व्यक्त करते संताप
मोक्षाची सोयरीक जुळवतो विश्वंभर
विश्वंभर त्याने मोक्षाची सोयरीक कशी जुळवली हे सर्वांना आनंदात सांगतो व श्रावणीला ताकीद देतो. शोभाच्या नवऱ्याने तिच्या आई व अण्णाचा अपमान करताच शुभ त्याला सुनावतो पण नंतर, हतबलतेने त्याची माफी मागतो.
मोक्षाची सोयरीक जुळवतो विश्वंभर
शुभ स्विटीशी लग्नाला होकार देईल का?
शुभची आई त्याला स्विटीशी लग्न करण्याचे सुचवते. मोक्षा पिहूने पसंत केलेला हार तिला हवा असल्याचा हट्ट नंदाक्काकडे करते. यामुळे नंदाक्का मुद्दाम विश्वंभरसमोर नाटक करत त्याला श्रावणीविरुद्ध भडकावते.
शुभ स्विटीशी लग्नाला होकार देईल का?
विश्वंभर सुनावतो श्रावणीला शिक्षा
विश्वंभर शिक्षा म्हणून श्रावणीला नंदाक्काचे पाय धरायला सांगतो. पुढे, विश्वंभर एका राजकीय योजनेसाठी श्रावणीला त्याच्यासोबत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला येण्याचे सांगतो. यामुळे नंदाक्का कपट करायचे ठरवते.
विश्वंभर सुनावतो श्रावणीला शिक्षा
नंदाक्का घडवते श्रावणीचा अपघात
श्रावणीच्या हातून ध्वजारोहण होऊ नये म्हणून नंदाक्का तिचा अपघात घडवते. यामुळे चिडलेला विश्वंभर श्रावणीला सुनावत तिचा अपमान करतो. नंदाक्काच्या कपटामुळे विश्वंभर मोक्षाला ध्वजारोहणाचा मान द्यायचे ठरवतो.
नंदाक्का घडवते श्रावणीचा अपघात
श्रावणी विश्वंभरसोबत करते ध्वजारोहण
शुभने शक्कल लढवल्यामुळे मोक्षा तिचा होणार नवरा, कार्तिकसोबत बाहेर जाते. यामुळे नाईलाजाने ध्वजारोहणासाठी विश्वंभर श्रावणीला न्यायला घरी येतो. आनंदलेली श्रावणी विश्वंभरसोबत ध्वजारोहण करते.
श्रावणी विश्वंभरसोबत करते ध्वजारोहण
शुभ व श्रावणी बनवतात विश्वंभरसाठी केक
विश्वंभर पत्रकारांसमोर श्रावणीला पेढा भरवतो यामुळे ती आनंदते. कार्यक्रमात पक्षप्रमुखांना आणण्याची योजना शुभची असल्याचे कळताच नंदाक्का चिडते. श्रावणी शुभच्या मदतीने विश्वंभरच्या वाढदिवसाचा केक बनवते.
शुभ व श्रावणी बनवतात विश्वंभरसाठी केक
नंदाक्का करते श्रावणीवर खोटे आरोप
विश्वंभर नंदाक्काने आणलेला केक न कापता शुभने आणलेला केक कापतो. नंदाक्का शुभ आणि श्रावणीला धडा शिकवण्यासाठी कपट करते. कार्तिक व श्रावणीला एकाच खोलीत बंद पाहून नंदाक्का श्रावणीवर खोटे आरोप करते.
नंदाक्का करते श्रावणीवर खोटे आरोप
विश्वंभरच्या गाडीचा होतो अपघात
श्रावणीने आईसाठी साडी पाठवल्याने शुभ तिचे आभार मानतो. विश्वंभर घराबाहेर पडताना श्रावणीला पाहून चिडतो. विश्वंभरच्या गाडीचा अपघात झाल्याचे कळताच शुभचे कुटुंब चिंतित होते व नंदाक्का श्रावणीला दोष देते.
विश्वंभरच्या गाडीचा होतो अपघात
शुभ व श्रावणीविरुद्ध नंदाक्काचे कपट
अपघातानंतर विश्वंभर घरी येताच नंदाक्का काळजीचे नाटक करते. विश्वंभरने तब्येत बरी होईपर्यंत त्याच्या कामाची जबाबदारी शुभवर सोपवल्याने नंदाक्काचा जळफळाट होतो व ती शुभ व श्रावणीविरुद्ध एक कपट करते.
शुभ व श्रावणीविरुद्ध नंदाक्काचे कपट
मदनला जबाबदारी देण्यास विश्वंभरचा नकार
नंदाक्काचा मुलगा, मदन घरी येताच ती व मोक्षा आनंदते. मदनने शुभची जबाबदारी मागताच विश्वंभर त्याला स्पष्ट नकार देतो. पुढे, मदन श्रावणीशी गैरवर्तन करतो व तेव्हाच विश्वंभरचा फोटो पडल्याने श्रावणी दुखावते.
मदनला जबाबदारी देण्यास विश्वंभरचा नकार
नंदाक्का तिच्या कंपटांविषयी सांगते मदनला
शुभने शोभाच्या नवऱ्याला भ्रष्टाचार करण्यास नकार दिल्याने शोभा त्याला ऐकवते व स्विटीने केलेल्या मदतीविषयी सांगते. नंदाक्का तिने आजवर केलेल्या कपटाविषयी मदनला सांगते व तो शुभविरुद्ध कपट करायचे ठरवतो.
नंदाक्का तिच्या कंपटांविषयी सांगते मदनला
श्रावणीच्या मदतीने शुभला सापडते फाईल
विश्वंभरने दिलेली फाईल शुभला सापडत नसल्याने संधी साधून नंदाक्का व मदन त्याच्याविरुद्ध बोलतात. मात्र श्रावणीमुळे शुभला ती फाईल सापडते. शुभची वाट बघून ताटकळलेली स्विटी तो येताच वाढदिवस साजरा करते.
श्रावणीच्या मदतीने शुभला सापडते फाईल
शुभ सांगतो त्याच्या आवडत्या मुलीविषयी
शुभकडून त्याच्या आवडत्या मुलीचे वर्णन ऐकून स्विटी नाराज होते. मोक्षाच्या लग्नाची तयारी सुरु असताना शुभ श्रावणीसाठी एक भेट आणतो. पुढे, लग्नाला आलेल्या शुभच्या कुटुंबीयांना सुरक्षारक्षक रोखतो.
शुभ सांगतो त्याच्या आवडत्या मुलीविषयी
श्रावणीचा बदला घेणार मदन
शुभच्या कुटुंबाचा लग्नात अपमान व्हावा म्हणून नंदाक्काने केलेली योजना श्रावणीमुळे फिस्कटते. पुढे, श्रावणी व शुभला एकत्र पाहून चिडलेल्या मदनला श्रावणीचा बदला घेण्यासाठी नंदाक्का कल्पना सांगते.
श्रावणीचा बदला घेणार मदन
विकीमुळे मोक्षा करते आत्महत्येचा प्रयत्न
श्रावणीने कार्तिकच्या तोंडावर पाणी टाकल्याने संतप्त विश्वंभर तिला मंडपात न थांबण्याचे बजावतो. मोक्षाचा आधीचा प्रियकर, विकी तिला धमकावतो. यामुळे आत्महत्या करणाऱ्या मोक्षाला श्रावणी रोखते व वचन देते.
विकीमुळे मोक्षा करते आत्महत्येचा प्रयत्न
शुभ आणि श्रावणी घरात नसल्याने सर्व चिंतित
श्रावणी शुभला घेऊन विकीला भेटायला येते. नंदाक्का एका विधीसाठी श्रावणीला बोलावते पण शुभ आणि श्रावणी घरात नसल्याचे कळताच सर्व चिंतित होतात. मोक्षा परिस्थिती सावरण्यासाठी स्विटीला विधी करण्यास सांगते.
शुभ आणि श्रावणी घरात नसल्याने सर्व चिंतित
मोक्षा मानते शुभचे आभार
शुभ विकी व गुंडांशी दोन हात करुन त्यांना अद्दल घडवतो. शुभ व श्रावणी सर्व पुरावे घेऊन घरी येतात व मोक्षा मदत करण्यासाठी शुभचे आभार मानते. मदन शुभच्या वडिलांचा अपमान करुन त्यांच्या कानाखाली मारतो.
मोक्षा मानते शुभचे आभार
मोक्षा विकीचे सत्य सांगते कार्तिकला
श्रावणी विकीचे सत्य कार्तिकला सांगण्याचा सल्ला मोक्षाला देते. लग्नविधी सुरु असताना मोक्षा कार्तिकला एका खोलीत नेऊन तिचे सत्य सांगते. पुढे, कार्तिकची प्रतिक्रिया पाहून मोक्षा व श्रावणी चकित होतात.
मोक्षा विकीचे सत्य सांगते कार्तिकला
श्रावणी विचारते नंदाक्काला जाब
लग्न सुरु असताना मोक्षाने एका विधीचा मान श्रावणीला दिल्याने सर्व चकित होतात. नंदाक्काच्या चपलेखाली विश्वंभरचा फोटो पाहून श्रावणीला तिला जाब विचारते. मदनने अण्णांचा अपमान केल्याचे कळताच शुभ चिडतो.
श्रावणी विचारते नंदाक्काला जाब
Details About शुभ श्रावणी TV Show :
| Movie Released Date | 19 Jan 2026 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

