
रामायण
Available in Marathi
दशरथाने कैकयीला दिलेले वचन पाळण्यासाठी श्रीरामाने १४वर्ष वनवास भोगला. रावणाने सीतेचे अपहरण केल्यावर श्रीरामाने त्याच्याशी युद्ध केले व ते जिंकून अयोध्येत परतल्यावर राजा म्हणून कार्यभार सांभाळला.
Director & Cast
TV Show Details
दशरथाच्या तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती
कैकयीने युद्धात केलेल्या मदतीमुळे राजा दशरथ तिला दोन वर मागण्यास सांगतो. पुढे, शृंगी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली राजा दशरथ पुत्रकामेष्टी यज्ञ करतो. परिणामी, दशरथाच्या तिन्ही राण्यांना पुत्र होतात.
दशरथाच्या तिन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती
भगवान विष्णू सांगतात रामावताराचा हेतू
वसिष्ठ ऋषी दशरथपुत्रांचे अनुक्रमे राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न असे नामकरण करतात. शंकर व ब्रह्मदेवांना विष्णू त्यांच्या रामावताराचा हेतू सांगतात. पुढे, चारही भावंड वसिष्ठ ऋषींच्या गुरुकुलामध्ये जातात.
भगवान विष्णू सांगतात रामावताराचा हेतू
रामाला कळते रघुकुळाचे वैशिष्ट्य
राम व त्याचे बंधू गुरुकुलात तर, अयोध्येत त्यांचे आई-वडील एकमेकांसाठी व्याकुळ होतात. गुरुकुलात राम व इतरांचे शिक्षण सुरु होते. वसिष्ठ ऋषी त्यांना रघुकुलाचे वैशिष्ट्य सांगत जबाबदारीची जाणीव करून देतात.
रामाला कळते रघुकुळाचे वैशिष्ट्य
विश्वामित्र करतात दशरथाकडे एक मागणी
गुरुकुलातून परतलेल्या राम व त्याच्या भावांना पाहून सर्व आनंदतात. विश्वामित्र एका समस्येविषयी सांगत दशरथाकडे एक मागणी करतात. त्यानुसार राम व लक्ष्मण विश्वामित्रांसोबत सिद्धाश्रमात जाण्यास तयार होतात.
विश्वामित्र करतात दशरथाकडे एक मागणी
राम करतो ताडका व सुबाहूचा वध
विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार राम ताडकाचा वध करतो. सिद्धाश्रमातील यज्ञात विघ्न आणणाऱ्या मारीच-सुबाहू यांच्यापैकी राम सुबाहूचा वध करतो. विश्वामित्र राम-लक्ष्मणाला त्यांच्यासोबत मिथिलेला येण्यास सांगतात.
राम करतो ताडका व सुबाहूचा वध
राम अहिल्येला करतो शापातून मुक्त
विश्वामित्रांच्या आज्ञेनुसार राम अहिल्येला शापातून मुक्त करतो. राम-लक्ष्मण व विश्वामित्र मिथिलेत पोहोचतात. रामाचे कौतुक करत जनक त्याची पत्नी, सुनयनाजवळ एक भीती व्यक्त करतो. राम-सीता एकमेकांसमोर येतात.
राम अहिल्येला करतो शापातून मुक्त
सीतेच्या स्वयंवराला होते सुरुवात
देवीच्या कौलाने सीता आनंदते. राम सीताविषयीच्या भावना लक्ष्मणला सांगतो. सीतेच्या स्वयंवराला सुरुवात होते. स्वयंवरातील पण कोणी पूर्ण करू न शकल्याने सीताची बहीण तिच्यासमोर एक भीती व्यक्त करते.
सीतेच्या स्वयंवराला होते सुरुवात
रामाने पण पूर्ण केल्याने आनंदते सीता
विश्वामित्रांच्या सांगण्यावरून राम पण पूर्ण करण्यास जातो. तेव्हा सीता पार्वतीला प्रार्थना करते व रामाने पण पूर्ण करताच आनंदते. रामाकडून शिवधनुष्य तुटल्याने क्रोधित परशुराम स्वयंवराच्या ठिकाणी येतात.
रामाने पण पूर्ण केल्याने आनंदते सीता
बाणासुर येतो सीतेचे अपहरण करण्यास
रामाच्या विनंतीवरून विश्वामित्र जनकासमोर एक प्रस्ताव मांडतात. लक्ष्मणाने त्याचा लग्नाबाबतचा निर्णय रामाला सांगतानाच ते उर्मिला ऐकते. बाणासुर सीतेचे अपहरण करण्यासाठी जनकाच्या महालात येतो.
बाणासुर येतो सीतेचे अपहरण करण्यास
राम-सीतेच्या लग्नासाठी वसिष्ठ ऋषींचा सल्ला
शतानंदानी रामाच्या पत्रिकेबाबत केलेल्या भाकितामुळे वसिष्ठ ऋषी जनक-दशरथाला विशिष्ट मुहूर्तावर राम-सीतेचे लग्न करण्यास सांगतात. मात्र हे घडल्यास उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय म्हणून सर्व देव एक योजना आखतात.
राम-सीतेच्या लग्नासाठी वसिष्ठ ऋषींचा सल्ला
राम घेतो एक प्रतिज्ञा
चारही नव दाम्पत्यांचा अयोध्येत गृहप्रवेश होतो. राम-सीतेचे लग्न मुहूर्तावर न झाल्याने कौसल्या-कैकयीने सुचवल्याप्रमाणे दशरथ रामाला दुसरे लग्न करण्याबाबत त्याचे मत विचारतो. तेव्हाच राम एक प्रतिज्ञा घेतो.
राम घेतो एक प्रतिज्ञा
राजा होण्यासाठी राम व भरतामध्ये स्पर्धा
दशरथाने त्याचे स्वप्न सांगताच विश्वामित्र त्याला एक स्पर्धा घेत नवीन राजाची निवड करण्यास सांगतात. विविध चर्चेनंतर राम व भरतामध्ये स्पर्धा होते. पुढे, स्पर्धेचा निकाल ऐकून मात्र मंथरेचा संताप होतो.
राजा होण्यासाठी राम व भरतामध्ये स्पर्धा
कैकयीचे कान भरण्याचा मंथरेचा प्रयत्न
स्पर्धेत राम विजयी झाल्याने चिडलेली मंथरा दशरथाला त्याच्या वचनाची आठवण करून देते. पुढे, भरत त्याच्या आजोळी जातो. रामाचा राज्याभिषेक होणार असल्याची बातमी ऐकताच मंथरा कैकयीचे कान भरण्याचा प्रयत्न करते.
कैकयीचे कान भरण्याचा मंथरेचा प्रयत्न
कैकयी दशरथाकडे मागते दोन वर
कौसल्येचे रामासोबतचे बोलणे ऐकून कैकयीला मंथरेचे म्हणणे पटते व ती दु:खी होते. एकीकडे रामाच्या राज्याभिषेकाच्या विधीला सुरुवात होते तर, दुसरीकडे कैकयी दशरथाकडे तिचा रोष व्यक्त करत दोन वर मागते.
कैकयी दशरथाकडे मागते दोन वर
दशरथाचे वचन पूर्ण करण्याचा रामाचा निर्णय
कैकयीने मागितलेले वर ऐकून दशरथ व्यथित होतो. राम सिंहासनावर बसणार इतक्यात मंथरा एक वाईट बातमी सांगते. कैकयीच्या वरांविषयी कळताच सगळ्यांना धक्का बसतो. राम मात्र दशरथाचे वचन पूर्ण करण्याचा निर्णय घेतो.
दशरथाचे वचन पूर्ण करण्याचा रामाचा निर्णय
राम-सीता व लक्ष्मण निघतात वनवासासाठी
रामाला वनवासात जाण्यास नकार देणाऱ्या सर्वांना तो समजावतो. सीतेसह लक्ष्मणही रामासोबत जाण्यास तयार होतो व उर्मिला त्याला पाठिंबा देत एक प्रतिज्ञा करते. पुढे, सर्वजण साश्रू नयनांनी रामाला निरोप देतात.
राम-सीता व लक्ष्मण निघतात वनवासासाठी
राजा निषाद आणि शशीकेतू यांची रामाशी भेट
रामाबरोबर वनवासात निघालेली प्रजा व सुमंत रात्री झोपलेले असतानाच राम-लक्ष्मण व सीता तिथून निघून जातात. वनवासात रामाची भिल्ल राजा निषादची व शशीकेतू राजाची भेट होते. दरम्यान, रावण शनिदेवाला आव्हान देतो.
राजा निषाद आणि शशीकेतू यांची रामाशी भेट
रामाला कळते दशरथाच्या मृत्यूचे रहस्य
रावण शनीदेवाला बंदी बनवतो. दशरथ मृत्यूशय्येवर असल्याचे सीतेला स्वप्नात कळते. ती वनात पुरावा देत दशरथ स्वर्गवासी झाल्याचे रामाला सांगते. विलाप करणाऱ्या रामाला नारद दशरथाच्या मृत्यूचे रहस्य सांगतो.
रामाला कळते दशरथाच्या मृत्यूचे रहस्य
राम देतो सीतेला एक वचन
राम-लक्ष्मण दशरथाचे श्राद्ध विधी करतात. नाराज सीतेची माफी मागत राम तिला एक वचन देतो. केवटला स्वतःची चूक कळताच तो नावेतून राम-सीता व लक्ष्मणाला नदी पल्याड सोडतो. कैकयी तिची भीती मंथरेला सांगते.
राम देतो सीतेला एक वचन
भरत तोडतो कैकयीसोबतचे नाते
कैकयीवर चिडलेला भरत तिच्यासोबतचे नाते तोडतो. रामाला अयोध्येत परत आणण्याचे भरत ठरवतो व मंथरेला कारागृहात बंदिस्त करण्याचे शत्रुघ्नला सांगतो. पुढे, राम-सीता व लक्ष्मणाची भेट भारद्वाज ऋषींसोबत होते.
भरत तोडतो कैकयीसोबतचे नाते
राम देतो अयोध्येत परतण्यास भरताला नकार
रावणाला अमरत्वाचे वरदान देण्याचे कारण ब्रह्मदेव इंद्र व नारदाला सांगतात. संतप्त लक्ष्मण रामाच्या शोधात आलेल्या भरतावर बाण रोखतो. अयोध्येत परत येण्यास नकार देणाऱ्या रामाला भरत त्याचा एक निर्णय सांगतो.
राम देतो अयोध्येत परतण्यास भरताला नकार
भरत मागतो रामाकडे त्याच्या पादुका
महर्षी वाल्मिकी सीतेला एक सल्ला देतात. रामाने त्याच्यावतीने राज्यकारभार सांभाळण्यास सांगताच भरत एक प्रतिज्ञा घेतो व रामाकडे त्याच्या पादुका मागतो. भरताच्या त्यागाविषयी जाणून कौसल्या भारावते.
भरत मागतो रामाकडे त्याच्या पादुका
इंद्रपुत्र जयंतवर राम सोडतो ब्रह्मस्त्र
महर्षी वाल्मिकी भृगु ऋषींनी विष्णूला दिलेल्या शापाविषयी रामाला सांगतात. इंद्राचा मुलगा जयंत, रामाला कमी लेखत त्याची परीक्षा घेतो. मात्र त्याच्या वागण्यावर चिडून राम त्याच्यावर ब्रह्मस्त्र सोडतो.
इंद्रपुत्र जयंतवर राम सोडतो ब्रह्मस्त्र
शकट-विकट दैत्यांचा वध
चिंतीत रावणाला त्याचे गुरु तपश्चर्या करण्याचा सल्ला देतात. शकट दैत्याच्या अत्याचाराविषयी कळताच राम-लक्ष्मण त्याला शिक्षा द्यायला निघतात. शकटाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी आलेल्या विकटाचा राम वध करतो.
शकट-विकट दैत्यांचा वध
अनसूया देते सीतेला एक विशेष भेट
शकट-विकटच्या मृत्यूविषयी जाणून रावण संतापतो. राम-लक्ष्मण व सीता अत्री ऋषींच्या आश्रमात गेले असता अनसूया सीतेला एका अमूल्य उपदेशासह एक भेट देते. पुढे, दंडकारण्यात निघालेला राम विराध राक्षसाचा वध करतो.
अनसूया देते सीतेला एक विशेष भेट
Details About रामायण TV Show :
| Movie Released Date | 15 Apr 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

