
चला हवा येऊ द्या
Available in Marathi
गुणवंत कलाकार नवनवीन विनोदी पात्रे आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील विडंबन व उपहासात्मक नाट्य सादर करतात. आखीव-रेखीव प्रहसनांसह उत्स्फूर्तपणे सुचललेल्या विनोदांमुळे प्रेक्षकांना खळखळून हसण्याचा अनुभव मिळतो.
Director & Cast
TV Show Details
अभिजीत करतो मार्गदर्शकांचे स्वागत
निवेदक अभिजीत खांडकेकर मार्गदर्शक कुशल बद्रिके, गौरव मोरे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे आणि प्रियदर्शन जाधव यांचे स्वागत करतो. पुढे, सादरीकरणे झाल्यावर निवडक स्पर्धक मार्गदर्शकांच्या गटात सामील होतात.
अभिजीत करतो मार्गदर्शकांचे स्वागत
२५ गुणवंत विनोदवीरांची होते निवड
विविध धमाल प्रहसनांमधून स्पर्धक त्यांचे कौशल्य मार्गदर्शकांसमोर सादर करतात व एकेका गटात सामील होतात. काही स्पर्धकांच्या हाती निराशा येते तर, अव्वल २५ गुणवंत विनोदवीरांची निवड केली जाते.
२५ गुणवंत विनोदवीरांची होते निवड
सिनेमाच्या चित्रीकरणात घडलेले धमाल नाट्य
अभिजीत खांडकेकर या पर्वातील लेखकांचे स्वागत करतो. सिनेमाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी घडलेले धमाल नाट्य मार्गदर्शक सादर करतात. प्रियदर्शन जाधव व कुशल बद्रिकेच्या संघाचे सादरीकरण होते.
सिनेमाच्या चित्रीकरणात घडलेले धमाल नाट्य
कडक परफॉर्मर ऑफ द वीक' चे नाव जाहीर
वडलांच्या पंचाहत्तरीचे धमाल नाट्य मार्गदर्शक सादर करतात. भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे व गौरव मोरेच्या संघातील कलाकार विनोदी प्रहसने सादर करतात व कडक परफॉर्मर ऑफ द वीकचे नाव जाहीर होते.
कडक परफॉर्मर ऑफ द वीक' चे नाव जाहीर
दादा कोंडके यांच्या जन्मदिनानिमित्त नाट्य
दादा कोंडके यांच्या जन्मदिनानिमित्त मार्गदर्शक वगनाट्याचे सादरीकरण करतात. पुढे, अतिक्रमण करायला आलेला अधिकारी नात्यांच्या बंधनात कसा अडकतो या विषयावरील प्रहसन स्पर्धक सादर करतात.
दादा कोंडके यांच्या जन्मदिनानिमित्त नाट्य
मार्गदर्शकांचे धमाल प्रहसन
परदेशातून आलेल्या मुलावर गावच्या सभेत आलेले संकट सादर करत मार्गदर्शक प्रेक्षकांना खळखळून हसवतात. पुढे, श्रेया बुगडे, गौरव मोरे व भारत गणेशपुरे यांच्या गटातील स्पर्धक प्रहसने सादर करत सर्वांना हसवतात.
मार्गदर्शकांचे धमाल प्रहसन
दहीहंडी विशेष धमाल प्रहसन
दहीहंडी विशेष भागात सर्व मार्गदर्शक एक धमाल प्रहसन सादर करत प्रेक्षकांना खळखळून हसवतात. प्रियदर्शन जाधव व कुशल बद्रिकेचे संघ अनुक्रमे स्वातंत्र्यदिन व स्वर्गातील हिशोब यावर नाट्य सादर करतात.
दहीहंडी विशेष धमाल प्रहसन
श्रेया व गौरवच्या गटातील विनोदवीरांचे नाट्य
श्रेयाचा गट एक महिला वृद्धाश्रमात एका आजोबाला दत्तक घ्यायला येते तेव्हा घडलेले नाट्य सादर करतो. गौरव मोरेचे विनोदवीर माहितीपटाचे चित्रीकरण करणाऱ्या एका माणसाचे अनुभव प्रहसनातून सादर करतात.
श्रेया व गौरवच्या गटातील विनोदवीरांचे नाट्य
जारण' चित्रपटानिमित्तचे खास प्रहसन
जारण चित्रपटातील व कमळी मालिकेतील कलाकारांचे अभिजीत स्वागत करतो. जारण चित्रपटानिमित्त विशेष नाट्य मार्गदर्शक सादर करतात व खळखळून हसवत भावुक करणारे एक खास नाट्य गौरव मोरेच्या संघातील कलाकार सादर करतात.
जारण' चित्रपटानिमित्तचे खास प्रहसन
कमळी मालिकेवरून एक विशेष प्रहसन
कमळी मालिकेवरून एक विशेष प्रहसन मार्गदर्शक व स्पर्धक सादर करतात. पुढे, श्रेया बुगडेच्या संघातील कलाकार दुबईला गेलेल्या जोडप्याविषयीचे प्रहसन सादर करत प्रेक्षकांना खळखळून हसवतात.
कमळी मालिकेवरून एक विशेष प्रहसन
आधुनिक 'माहेरची साडी' नाट्यातून सादर
सर्वांनी गणपतीची पूजा व आरती केल्यावर अभिजीत अलका कुबल व उषा नाडकर्णी यांचे स्वागत करतो. सर्व मार्गदर्शक 'माहेरची साडी' चित्रपटाचे आधुनिक रुप नाट्यातून सादर करतात. एक गणेशोत्सव विशेष प्रहसन सादर होते.
आधुनिक 'माहेरची साडी' नाट्यातून सादर
उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस होतो साजरा
उषा नाडकर्णी यांचा ८०वा वाढदिवस साजरा होतो. भारत गणेशपुरेचा गट खट्याळ मुलांमुळे शिक्षकाची कशी तारांबळ उडते हे प्रहसनातून सादर करतात. पुढे, विमानात प्रवास करणाऱ्या जोडप्याची गंमत नाटकातून सादर होते.
उषा नाडकर्णी यांचा वाढदिवस होतो साजरा
दशावतार' चित्रपटाच्या टीमची खास उपस्थिती
दशावतार' चित्रपटाच्या टीमचे अभिजीत स्वागत करतो. अभिरुप न्यायलयात एक अनोखा वडील-मुलाचा खटला दाखवणारे नाट्य रंगते. खळखळून हसवणाऱ्या दोन प्रहसनांनंतर गोड परफॉर्मर ऑफ द वीकचे नाव जाहीर होते.
दशावतार' चित्रपटाच्या टीमची खास उपस्थिती
दिलीप प्रभावळकर यांचा सर्जनशील सत्कार
दिलीप प्रभावळकर यांचा सत्कार करणारे विशेष नाट्य सादर होते. दशावतार चित्रपटाच्या टीमसोबत अभिजीत संवाद साधतो. शेवटी, कडक परफॉर्मर ऑफ द वीकचे नाव जाहीर होते.
दिलीप प्रभावळकर यांचा सर्जनशील सत्कार
मार्गदर्शकांच्या कुटुंबियांची विशेष उपस्थिती
अभिजीत व सर्व मार्गदर्शकांच्या कुटुंबातील सदस्यांचे मंचावर स्वागत होते व अभिजीत त्यांच्याशी संवाद साधतो. दोन चाळीतल्या टोकाच्या भांडणाने पोलीस ठाण्यात घडलेले धमाल नाट्य कलाकार सादर करतात.
मार्गदर्शकांच्या कुटुंबियांची विशेष उपस्थिती
विमानतळावर घडतो हशा पिकवणारा गोंधळ
विमानतळावर घडलेला गोंधळ आणि चित्रीकरणात बदलाने घडलेली धमाल नाट्ये कलाकार सादर करतात. मार्गदर्शकांच्या कुटुंबीयांशी गप्पा झाल्यावर सर्व मंचावर नृत्य करतात. शेवटी, परफॉर्मर ऑफ द वीकचे नाव जाहीर होते.
विमानतळावर घडतो हशा पिकवणारा गोंधळ
टाईमपास' सिनेमावर आधारित प्रहसन होते सादर
अभिजित कार्यक्रमाच्या बदललेल्या स्वरुपाबद्दल सांगून संजय जाधव व रवी जाधव यांच्यासोबत मजेशीर गप्पा मारतो. पुढे, मार्गदर्शक आणि कलाकार 'टाईमपास' सिनेमावर आधारित प्रहसन सादर करुन सर्वांना खळखळून हसवतात.
टाईमपास' सिनेमावर आधारित प्रहसन होते सादर
दुनियादारी' चित्रपटाची पुढची कहाणी
दुनियादारी चित्रपटात श्रेयसच्या मृत्यूनंतर घडलेली कहाणी मार्गदर्शक नाट्यातून सादर करतात. संजय जाधव व रवी जाधव हे मंचावर एक खेळ खेळतात व झटपट प्रश्नांची धमाल उत्तरे देत सर्वांचे मनोरंजन करतात.
दुनियादारी' चित्रपटाची पुढची कहाणी
लोककलावंत व रॅपर यांची खास उपस्थिती
लोककलावंत नंदेश उमप व सुरेखा पुणेकर आणि रॅपर क्रेटेक्स आणि श्रेयस यांचे अभिजीत स्वागत करतो. मंचावर आलेले दोन पोलीस त्यांच्यावर गमतीशीर आरोप करतात. नंतर, लोककला आणि रॅप संगीताची जुगलबंदी रंगते.
लोककलावंत व रॅपर यांची खास उपस्थिती
सुरेखाताई पुणेकरांसोबत झटपट प्रश्नफेरी
मंचावर लोकनाट्याची सद्यस्थिती मांडणारे नाट्य सादर होते. सुरेखाताई पुणेकर, नंदेश उमप व इतर झटपट प्रश्नफेरीत रंजक उत्तरे देतात. तेव्हाच त्यांचे काही चाहते त्यांना भेटायला येतात व रंजक खेळ खेळतात.
सुरेखाताई पुणेकरांसोबत झटपट प्रश्नफेरी
झी मराठीच्या कलाकारांचा अनोखा पुरस्कार सोहळा
अभिजित झी मराठीच्या कलाकारांचे स्वागत करुन त्यांच्याशी गप्पा मारतो. पुढे, विनोदवीर एक आगळ्यावेगळ्या पुरस्कार सोहळ्यात कलाकारांना मजेशीर पुरस्कार देतात. श्रेया आणि कुशल काही कलाकारांचा कायापालट करतात.
झी मराठीच्या कलाकारांचा अनोखा पुरस्कार सोहळा
झी मराठी अवॉर्ड नामांकन विशेष भाग
झी मराठीच्या प्रसिद्ध जोड्यांवर आधारित विनोदी नाट्य सादर होते. या नामांकन विशेष भागात झी मराठी अवॉर्ड २०२५ मध्ये नायिका व खलनायक म्हणून नामांकन मिळालेल्या कलाकारांना अभिजीत गमतीशीर आव्हाने देतो.
झी मराठी अवॉर्ड नामांकन विशेष भाग
हर्षदा खानविलकरांची होते अनोखी तुला
अभिजित लक्ष्मी निवास मालिकेतील कलाकारांचे स्वागत करतो. विनोदवीरांनी सादर केलेली आगळीवेगळी लक्ष्मी निवास मालिका पाहून सर्व कलाकार खळखळून हसतात. पुढे, हर्षदा खानविलकरांची एक अनोखी तुला होते.
हर्षदा खानविलकरांची होते अनोखी तुला
विनोदवीरांचे मजेशीर कविसंमेलन
दिवाळीनिमित्त आयोजित कविसंमेलनात विनोदवीरांच्या मजेशीर कविता ऐकून लक्ष्मी निवास मालिकेचे कलाकार हसून लोटपोट होतात. पुढे, अभिजित लक्ष्मी व भावनासोबत एक मजेशीर खेळ खेळतो व त्यांना काही प्रश्न विचारतो.
विनोदवीरांचे मजेशीर कविसंमेलन
पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या टीमची उपस्थिती
पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर व इतर कलाकारांचे अभिजीत स्वागत करतो व संवाद साधतो. तगड्या चाळीतील जत्रा समिती या सर्व कलाकारांना काही गमतीशीर आव्हाने देतात.
पुन्हा शिवाजीराजे भोसले'च्या टीमची उपस्थिती
Details About चला हवा येऊ द्या TV Show :
| Movie Released Date | 26 Jul 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

