
आम्ही दोघी
Available in Marathi
Aamhi Doghi is a Marathi drama television series starring Prasidhi Kishor, Vivek sangale, Khushboo Tawde, Satish Pulekar, Varsha Dandale and Vijay Nikam. This family drama revolves around two sisters, Meera and Madhura, who share an unbreakable bond. While the younger sister Madhura is notorious, fun loving and troublesome, Meera is very caring and protective towards her sister.
Director & Cast
TV Show Details
आम्ही दोघी - एपिसोड 1 - जून 25, 2018
मीराला दोन नकार आल्यामुळे तिच्या लग्नाची चिंता वाटत असल्याचे आनंद कुम्मूला सांगतो. नंतर, कुम्मू, मीरा व मधुराच्या खोलीत जाते व त्यांना संध्याकाळी घरी वेळेआधी येण्याच्या सूचना देते. कुम्मू मीराला तिच्या सर्वसामान्य राहणीमानावरून टोमणे मारते, ज्यामुळे तिला वाईट वाटते. दरम्यान, दिवाकरचा मुलगा आदित्य मुंबईला येणार असल्याचे आनंद कुम्मूला सांगतो. नंतर, मीरा चिंतेत असताना तिची मैत्रीण तिला प्रोत्साहित करते. दुसरीकडे, आनंद त्याच्या निधन झालेल्या बहिणीचा विचार करून भावुक होतो.
आम्ही दोघी - एपिसोड 1 - जून 25, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 2 - जून 26, 2018
आदित्य घरी आल्यावर तो मीराला बघायला येणारा मुलगा राजेश असल्याचा सर्वांचा गैरसमज होतो. आदित्य मीराचे सौंदर्य बघून स्तब्ध होतो व नकळतं त्याने आणलेली फुले तिला देण्यासाठी पुढे करतो. आदित्य वेळ साधून आनंद व सर्वांसमोर त्याची खरी ओळख सांगतो व गैरसमज दूर करतो. नंतर, राजेश त्याच्या आईसोबत मीराला बघायला येतो व मीराला बाहेर घेऊन जाण्याची परवानगी मागतो. इकडे, राजेश मीराला विचित्र प्रश्न विचारत असल्याने मधुरा त्याला सडेतोड उत्तरे देते. दुसरीकडे, आदित्य त्याच्यामुळे झालेल्या गैरसमजाबद्दल आनंदची माफी मागतो.
आम्ही दोघी - एपिसोड 2 - जून 26, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 3 - जून 27, 2018
"आम्ही दोघी ही शिवानी रंगोळे आणि खुशबू तावडे-साळवी यांच्या मुख्य भूमिका असलेली मराठी मालिका आहे. मीरा आणि मधुरा या दोन स्वभावाने एकदम भिन्न पण एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बहिणींची ही गोष्ट आहे. छोटी असणारी मधुरा ही खोडकर आणि स्वछंदी आहे तर मोठी मीरा ही समंजस व शांत आहे. या दोघींच्या अतूट नात्याबद्दल ही मालिका आहे."
आम्ही दोघी - एपिसोड 3 - जून 27, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 4 - जून 28, 2018
मीरा विशाखाला राजेशला ती पसंत असल्याचे सांगते. इकडे, आनंद राजेशकडून येणार्या फोनची वाट बघत असताना कम्मू त्याला लग्नाच्या ठरवाठरवीचे सल्ले देते. नंतर, मीरा व मधुरा बसने प्रवास करताना मधुरा तिला दिवसभरातील घटनांचा आढावा देते. मीरा व मधुरा घरी आल्यावर कम्मू राजेशच्या आईला फोन करते. मधुरा उद्धट असल्याचे कारण पुढे करून राजेशची आई मीराला नकार देते. कम्मू मधुरावर चिडते, तेव्हा मीरा भावुक होऊन मधुराची बाजू घेत लग्न न करण्याचे बोलते. दुसरीकडे, चिंतित आनंदचे आदित्य सांत्वन करतो.
आम्ही दोघी - एपिसोड 4 - जून 28, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 5 - जून 29, 2018
कम्मू आदित्यला घरात राहण्याचे नियम सांगते. नंतर, आदित्य आपल्यासोबत राहणार असल्याचे कळल्यावर अथर्व खुश होतो. आदित्य आनंदच्या घरी जेवायला जातो, तेव्हा मीरा उदास असल्याचे मधुरा त्याला इशार्याने सांगते. आदित्य मीराला हसविण्याचा प्रयत्न करतो, पण ती तिथून निघून जाते. आनंद आदित्यला मीराने तिच्या आई-वडिलांनी केलेल्या आत्महत्येची घटना जवळून पाहिल्याचे सांगतो. आदित्य भावुक झालेल्या आनंदचे सांत्वन करतो. दुसर्या दिवशी आदित्यच्या मिस्कील वागण्यावरून नकळत मीरा खळखळून हसते, ज्यामुळे आदित्य खुश होतो.
आम्ही दोघी - एपिसोड 5 - जून 29, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 6 - जून 30, 2018
क्ममूचा नवरा मीरासाठी आदित्यचे स्थळ सुचवितो, पण आदित्य अजून स्वतःच्या पायावर उभा नसल्यामुळे ती त्यासाठी मनाई करते. ऑफिसमध्ये, लग्नासाठी आपल्याला मुलाकडून पुन्हा नकार मिळाल्याचे मीरा विशाखाला सांगते. पण, यामुळे आनंद मामा चिंतीत असल्यामुळे तिला काळजी वाटत असलयाचे ती विशाखाला सांगते. दुसरीकडे, मधुरा तिच्या बॉसला भेटते व क्लायंटला तिचे काम आवडल्याची खुशखबर ते तिला देतात. त्यानंतर, मिहीर मधुराला सिनेमासाठी विचारतो तेव्हा ती मीरा आणि आदित्यालासुद्धा सोबत नेण्याचे सांगते.
आम्ही दोघी - एपिसोड 6 - जून 30, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 7 - जुलै 02, 2018
आनंदमामा, आदित्यला मीरा आणि मधुराच्या लहानपणीचे फोटो दाखवतात आणि त्या दोघींचे एकमेकांवर किती प्रेम आहे ते सांगतात. इकडे, राज्याध्यक्षांच्या घरी, खूप उशीर होण्याआधी लवकरात लवकर मधुराला मागणी घालण्याचा सल्ला मिहिरची बहीण मीहिरला देते. त्यानंतर, मीहीर, आदित्य, मधुरा, आणि मीरा सिनेमा पाहायला पाहायला जातात आणि प्रेम या विषयावर आपली मते मांडतात. नंतर, दुसर्या दिवशी, आपल्याला पाहायला येणार्या मुलाच्या प्रतिक्षेने त्रासलेल्या मीराला खुलवण्याचा प्रयत्न आनंदमामा करतात.
आम्ही दोघी - एपिसोड 7 - जुलै 02, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 8 - जुलै 03, 2018
मधुरा मीराला फोन करते आणि मिराला लग्नासाठी पाहायला येणाऱ्या मुलाबद्दल विचारते. दुसरीकडे, तरुण मुलांबद्दलची मधुराची मते ऐकून मिहीर अचंबित होतो. इकडे, कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव त्या व्यक्तीच्या डोळ्यांमधून कळतो असे मीराला पाहायला आलेला मुलगा म्हणतो. दरम्यान, मधुरा आपल्या घरी यायला निघते तेव्हा मिहीर तिला मुद्दाम प्रेमाचा विषय काढून गुंतवून ठेवतो. नंतर मीराला पाहायला आलेला मुलगा कम्मुला फोन करून आपल्या भावना सांगतो. नंतर मधुरा मीराला काही सल्ले देते.
आम्ही दोघी - एपिसोड 8 - जुलै 03, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 9 - जुलै 4, 2018
मीराचं लग्न ठरल्यामुळे कम्मू खूप खुश असते व ती तिच्या परिवाराकडे तिचा आनंद व्यक्त करते. दुसरीकडे, मिहीरची आई मिहीरला लवकरात लवकर मधुराला प्रपोज करण्याचा सल्ला देते. पण, मधुराच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे का, हे जाणून घेतल्याशिवाय तो तिला त्याचे प्रेम व्यक्त करू शकत नाही असे तिला सांगतो. दरम्यान, आनंद मामा आपल्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करत असल्याचे पाहून मीरा त्याला त्याचे पैसे खर्च करण्यास मनाई करते. आपण साठवलेले पैसेच खर्च करावेत असे मीरा आनंदला सांगते.
आम्ही दोघी - एपिसोड 9 - जुलै 4, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 10 - जुलै 5, 2018
कम्मू मध्यरात्री आनंदच्या घरी येऊन आदित्य घरात नसल्याचे सांगते. कम्मूला आदित्य घरात चोरी करून फरार झाल्याचा संशय वाटतो. दरम्यान, मीराही घरी नसल्याचे आनंदला कळल्यावर सर्वजण चिंतित होतात. मीरा व आदित्य एकत्र पळाले असल्याचा संशय व्यक्त करून कम्मू आरडाओरड करते. कम्मूचा आवाज ऐकून मीरा घाबरते, तेव्हा आदित्य हुशारीने परिस्थिती सांभाळतो. मीरा घरी आल्यावर कम्मू तिच्यावर चिडचिड करते. दुसरीकडे, आदित्य मीरासोबत घालविलेले क्षण आठवतो. नंतर, अक्षय मीराला फोन करून भेटायला बोलवितो.
आम्ही दोघी - एपिसोड 10 - जुलै 5, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 11 - जुलै 06, 2018
अक्षयला भेटयला जायला मीराला अस्वस्थ वाटते म्हणून ती मधुराला आपल्यासोबत यायला सांगते. आदित्याला आपल्या आईची खूप आठवण येते. नंतर, मीरा आणि आदित्यचा स्वभाव एकमेकांसारखा असल्याचे अथर्व आदित्याला सांगतो. नंतर, आपल्याला इतक्यात लग्न करायचे नसल्याचे मधुरा मीहिरच्या घरच्यांना सांगते. इकडे, अक्षयची आई लग्नातील देण्याघेण्याची बोलणी करण्यासाठी मीराच्या घरी येते आणि हुंडा मागते. हे ऐकून कम्मू मावशी आणि आनंदमामा विचारात पडतात. नंतर, मीरा अक्षयला भेटते तेव्हा अक्षय मीरासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतो.
आम्ही दोघी - एपिसोड 11 - जुलै 06, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 12 - जुलै 7, 2018
अक्षयच्या आईने मागितलेला अवास्तव हुंडा ऐकून कम्मू विरोध करते पण आनंदमामा अक्षयच्या आईच्या सगळ्या मागण्या मान्य करतात. नंतर, अक्षयच्या आई लगबगीने निघून जाऊ लागते त्यावेळी तिथे आलेल्या आदित्यला अक्षयच्या आईचे वागणे बोलणे संशयास्पद वाटते. नंतर, मीरासारख्या सालस मुलीला फसवण्याबद्दल अक्षयची आई अक्षयला सांगते पण आपल्या आईच्या भोळेपणाचा फायदा घेऊन अक्षय आईला गप्प करतो आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कृती करण्यास सांगतो. नंतर, अक्षयची आई दुसर्याच दिवशी अक्षय-मीराच्या साखरपुडा करावा असे कम्मूला सांगते.
आम्ही दोघी - एपिसोड 12 - जुलै 7, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 13 - जुलै 9, 2018
अक्षय महाग अंगठीसोबत गोफसुद्धा विकत घेतो व त्याचे पैसे तो स्वतः देईल असे आनंदला सांगतो. पण, क्रेडिट कार्ड नसल्याचे नाटक करून तो आनंदला तात्पुरते पैसे भरायला लावतो. ऑफिसमध्ये, मीरा विशाखाशी अक्षयच्या विचित्र वागणुकीबद्दल बोलते तेव्हा विशाखा तिला यातून मार्ग कसा निघेल याचा योग्य सल्ला देते. दुसरीकडे, आदित्य आनंदला अक्षयची चौकशी करण्याचा सल्ला देतो. नंतर, आनंद माधवकडे अक्षयबद्दलची चिंता व्यक्त करतो, तेव्हा माधव त्याला मीराच्या लग्नाची घाई न करण्याचा सल्ला देतो.
आम्ही दोघी - एपिसोड 13 - जुलै 9, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 14 - जुलै 10, 2018
मीरा अक्षयने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचते व अक्षय तिला त्याच्या मित्रांशी ओळख करून देतो. दरम्यान, कम्मू मीराच्या साखरपुड्याच्या खर्चाबद्दल आनंदशी बोलते. आदित्यचे लग्नाबद्दलचे मत ऐकून मधुरा त्याचे कौतुक करते. नंतर, मीराचा पडलेला चेहरा पाहून तिचं काहीतरी बिनसलं असावं असं आदित्यला जाणवतं. तो रात्री तिला मेसेजद्वारे तिच्या चिंतेमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, पण ती काहीच बोलत नाही. दुसऱ्या दिवशी, मीरा कम्मूकडे अक्षयबद्दलची शंका व्यक्त करते तेव्हा आदित्य त्यांचं बोलणं चोरून ऐकतो.
आम्ही दोघी - एपिसोड 14 - जुलै 10, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 15 - जुलै 11, 2018
शशांक मिहिरला मधुराच्या आयुष्यात स्थान मिळविण्यासाठी स्वत:च्या करियरवर लक्ष्य केंद्रीत करण्याचा सल्ला देतो. दरम्यान, मीराच्या साखरपुड्याची तयारी करताना कुटुंबीय मजा-मस्तीचे वातावरण निर्माण करतात. इकडे, अक्षयच्या वागणुकीमुळे चिंताग्रस्त असणार्या मीराचे विशाखा सांत्वन करते. दुसरीकडे, अक्षयचे पितळं उघडे पाडण्यासाठी आदित्य त्याचा पाठलाग करतो, तेव्हा अक्षयचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे त्याच्या लक्षात येते. नंतर, मीरा आदित्यला फोन करून भेटायला बोलविते. मीरा व आदित्यच्या बोलण्यात कम्मू व्यत्यय आणते.
आम्ही दोघी - एपिसोड 15 - जुलै 11, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 16 - जुलै 12, 2018
मीरा लग्न करून दुसर्या घरी जाणार असल्याने मधुरा भावुक होते. दरम्यान, अक्षयच्या बोलण्यावरुन त्याची आई आनंदला फोन करून लग्नाची बोलणी करण्यासाठी घरी येणार असल्याचे त्यांना कळविते. अक्षयचे कुटुंबीय घरी येणार असल्याने आनंद चिंतित असतो, तेव्हा कम्मू त्याला समजाविते. अक्षय घरी येऊन मीराच्या लग्नासाठी एकत्र केलेले पैसे ‘चिमणी पाखरे’ नावाच्या आश्रमाला दान करण्यासाठी त्याला देण्याचे आनंदला सांगतो. नंतर, अक्षय मीराला फोन करून साखरपुड्याची तारीख ठरवली असल्याची बातमी देतो.
आम्ही दोघी - एपिसोड 16 - जुलै 12, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 17 - जुलै 13, 2018
अक्षयने माफी मागितल्यामुळे मीरा तिचा आनंद विशाखासमोर व्यक्त करते. दरम्यान, मधुरा आदित्यचे कौतुक करत असल्याने मिहिरला ईर्षा वाटते. इकडे, नोकरीच्या नावाने बोगस कंपनीने फसविले असल्याने आदित्य भावुक होतो. दुसरीकडे, मीरा घरी आल्यावर आनंद तिला साखरपुडयाची खुशखबरी देतो. सर्वजण मीराच्या साखरपुडयाबद्दल बोलत असताना आदित्य तिथे येतो व त्याच्या फसवणुकीबद्दल सांगतो. कम्मू आदित्यला टोचून बोलताना माधवराव त्याची बाजू घेतात. दरम्यान, मधुरा शशांकला फोन करून आदित्यच्या नोकरीसाठी शिफारस करते.
आम्ही दोघी - एपिसोड 17 - जुलै 13, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 18 - जुलै 14, 2018
"आम्ही दोघी ही शिवानी रंगोळे आणि खुशबू तावडे-साळवी यांच्या मुख्य भूमिका असलेली मराठी मालिका आहे. मीरा आणि मधुरा या दोन स्वभावाने एकदम भिन्न पण एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बहिणींची ही गोष्ट आहे. छोटी असणारी मधुरा ही खोडकर आणि स्वछंदी आहे तर मोठी मीरा ही समंजस व शांत आहे. या दोघींच्या अतूट नात्याबद्दल ही मालिका आहे."
आम्ही दोघी - एपिसोड 18 - जुलै 14, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 19 - जुलै 16, 2018
अक्षय घरी आल्यावर आनंद त्याला पूर्वासोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारतो. अक्षय चालखीने पूर्वा त्याची मानस बहीण असल्याचे सर्रास खोटे बोलून सर्वांना ते पटवून देतो. दरम्यान, आदित्यला आपल्या कार्यालयात नोकरी दिल्यामुळे मिहिर त्याची अस्वस्थता शशांकसमोर व्यक्त करतो. शशांक मधुराला लवकरात लवकर मागणी घालण्याचा सल्ला मिहिरला देतो. इकडे, आदित्यच्या संशयामुळे कम्मू त्याच्यावर चिडते. दुसरीकडे, आदित्य, मधुराला अक्षय चांगला मुलगा नसल्याचे पुन्हा ठामपणे सांगतो, तेव्हा मीरा त्याच्या बोलण्याचे खंडन करते.
आम्ही दोघी - एपिसोड 19 - जुलै 16, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 20 - जुलै 17, 2018
आदित्य अथर्वला मीराच्या साखरपुड्याआधीचं अक्षयला रंगेहात पकडण्याचे बोलतो. दरम्यान, आनंद मीराचा साखरपुडा निर्विघ्न पार पडण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. इकडे, आदित्यच्या हाताला दुखापत झाल्याचे बघून मीरा त्यावर मलमपट्टी करते. आदित्य मीराला घसरून पडल्याचे खोटे सांगतो. नंतर, मिहिरच्या नावावरून मीरा मधुराची मस्करी करते. दुसरीकडे, आदित्य अथर्वला अक्षयच्या गुंडांनी आपल्यावर हल्ला करून धमकाविल्याचे सांगतो. आदित्य व अथर्व अक्षयच्या गाडीचा पाठलाग करतात व भाडेकरू गुंडांबरोबरचे त्याचे बोलणे शूट करतात.
आम्ही दोघी - एपिसोड 20 - जुलै 17, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 21 - जुलै 18, 2018
माधवराव साज-शृंगार करण्यात व्यस्त असणार्या कम्मूला अप्रत्यक्ष टोमणा मारतात. इकडे, शर्वरी मधुराला मागणी घालण्यासाठी मिहिरला प्रोत्साहित करते. दुसरीकडे, अक्षय पूर्वाशी खोटे बोलून गेल्यावर आदित्य व अथर्व तिला भेटतात. नंतर, मीरा साखरपुडयासाठी तयार होऊन देवाकडे मामाचा आनंद टिकून राहण्यासाठी शुभकार्य निर्विघ्न पार पडण्याची प्रार्थना करते. आनंद मीराच्या साखरपुडयासाठी आलेल्या पाहुणेमंडळीचे स्वागत करतो. दरम्यान, अक्षय ऐन साखरपुडयाचे विधी सुरू असताना तिथून उठून जातो व आनंदशी एकांतात पैश्यांची मागणी करतो.
आम्ही दोघी - एपिसोड 21 - जुलै 18, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 22 - जुलै 19, 2018
"आम्ही दोघी ही शिवानी रंगोळे आणि खुशबू तावडे-साळवी यांच्या मुख्य भूमिका असलेली मराठी मालिका आहे. मीरा आणि मधुरा या दोन स्वभावाने एकदम भिन्न पण एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बहिणींची ही गोष्ट आहे. छोटी असणारी मधुरा ही खोडकर आणि स्वछंदी आहे तर मोठी मीरा ही समंजस व शांत आहे. या दोघींच्या अतूट नात्याबद्दल ही मालिका आहे."
आम्ही दोघी - एपिसोड 22 - जुलै 19, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 23 - जुलै 20, 2018
"आम्ही दोघी ही शिवानी रंगोळे आणि खुशबू तावडे-साळवी यांच्या मुख्य भूमिका असलेली मराठी मालिका आहे. मीरा आणि मधुरा या दोन स्वभावाने एकदम भिन्न पण एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बहिणींची ही गोष्ट आहे. छोटी असणारी मधुरा ही खोडकर आणि स्वछंदी आहे तर मोठी मीरा ही समंजस व शांत आहे. या दोघींच्या अतूट नात्याबद्दल ही मालिका आहे."
आम्ही दोघी - एपिसोड 23 - जुलै 20, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 24 - जुलै 21, 2018
"आम्ही दोघी ही शिवानी रंगोळे आणि खुशबू तावडे-साळवी यांच्या मुख्य भूमिका असलेली मराठी मालिका आहे. मीरा आणि मधुरा या दोन स्वभावाने एकदम भिन्न पण एकमेकींवर जीवापाड प्रेम करणाऱ्या बहिणींची ही गोष्ट आहे. छोटी असणारी मधुरा ही खोडकर आणि स्वछंदी आहे तर मोठी मीरा ही समंजस व शांत आहे. या दोघींच्या अतूट नात्याबद्दल ही मालिका आहे."
आम्ही दोघी - एपिसोड 24 - जुलै 21, 2018
आम्ही दोघी - एपिसोड 25 - जुलै 23, 2018
कम्मू मीराला लग्नात विघ्न टाळण्यासाठी ज्योतिषाने सांगितलेला उपाय सांगते. मीराला दर मंगळवारी उपवास करावा लागेल व गणपतीच्या देवळात अनवाणी जावं लागेल असे ती सांगते. मधुरा आणि आदित्य यासाठी विरोध करतात, पण मीरा कम्मूचं ऐकते. आनंदही कम्मूच्या विरोधात काही बोलत नसल्याचे पाहून मधुरा चिडते. आदित्य मीरासोबत गणपतीच्या देवळात जाण्याचे ठरवतो. मीरा नेहमी दुसऱ्याचं ऐकत असल्यामुळे मधुरा वैतागते, पण आदित्य तिची समजूत काढतो. रात्री, मधुरा आनंदवर चिडल्याबद्दल त्याची माफी मागते.
आम्ही दोघी - एपिसोड 25 - जुलै 23, 2018
Details About आम्ही दोघी TV Show :
| Movie Released Date | 25 Jun 2018 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|

