‘आपले ठेवायचे झाकून दुसऱ्याचे पहायचे वाकून’ हा एक मराठी विनोदी कार्यक्रम आहे. डॉ. निलेश साबळे, वैभव मांगले, हेमांगी कवी, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके व इतर अनेक सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आपल्याला यात विविध पात्रांच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. राजकारण, काव्यदरबार ते अनेक रोजच्या जगण्यावर भाष्य करणारी ही धमाल विनोदी नाट्ये आपल्याला नक्कीच खळखळून हसवणारी मेजवानीच असणार आहेत.