युवा सिंगर एक नंबर: मजेदार क्षणांनी सजलेल्या फिनालेला पाहण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवा

Manjiri Shete

November 5, 2019

Entertainment

1 min

zeenews

 

युवा सिंगर एक नंबरमध्ये , स्पर्धक नेहमीच त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीने प्रकाशझोतात येतात. ऑगस्टमध्ये सुरु झालेल्या गायन रिऍलिटी शोच्या सुरूवातीपासूनच, आम्ही या स्पर्धकांच्या सुंदर आवाजामुळे वेळोवेळी आश्चर्यचकित झालो आहोत. या प्रवासात, वेळोवेळी परीक्षकांनी केलेल्या आपल्या मार्गदर्शकाने स्पर्धक स्वत:त सुधारणा घडवून आणताना आपण पाहिले. आता, हा रिऍलिटी शो अंतिम टप्प्यावर आला आहे, त्यामुळे हा अंतिम सोहळा पाहण्यासाठी सज्ज व्हा कारण मनोरंजनासोबत काही आश्चर्याचे धक्केही आपलयाला बसणार आहेत.

खाली युवा सिंगर एक नंबरचा एपिसोड पाहा:

मागील काही दिवसांपासून युवा सिंगर एक नंबरचं ZEE5 वर स्ट्रिमिन्ग सुरु आहे, तेव्हा आम्ही त्याची उत्सुकतेने वाट पाहत असू. ही गायन स्पर्धा आमच्या आवडीच्या कार्यक्रमांपैकी एक बनली आहे. आम्हाला याची सवय झाली आहे, तसेच आम्ही हे हि विसरलो कि हा शो लवकरच संपणार आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून हा शो खूप महत्वाचा ठरला आहे. आणि त्याच्या शेवटही खूप दमदार होईल याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. माननीय श्री. शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय या महाअंतिम सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. व्हिडिओ पहा!

हा व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात येईल कि केवळ तुमचे आवडते स्पर्धकच नाही, तर सोबतच तुम्हाला मृण्मयी देसपांडे यांचे गोड भाष्य आणि फक्त तुमच्यासाठी आयोजित केलेल्या खास कामगिरीची आठवणही तुम्हाला होणार आहे. आपण आमच्याइतकेच फिनाले पाहण्यास उत्सुक आहात? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा. 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता हा महा-अंतिम सोहळा पाहण्यास विसरू नका.

दरम्यान, अधिक मनोरंजनासाठी, आपल्या आवडत्या टीव्ही शोचे नवीनतम एपिसोड ZEE 5 वर विनामूल्य पाहा.

Related Topics

Related News

More Loader