प्रेम पॉइजन पंगा: आलापचा भाऊ जुईचे रहस्य जाणून घेणार?

Manjiri Shete

November 13, 2019

Entertainment

1 min

प्रेम पॉइजन पंगा मधील जुई आणि आलाप यांची प्रेमकथा प्रत्येक भागागणिक जटिल होत चालली आहे. जुई जेव्हा ‘इच्छाधारी नागिन’ झाली, तेव्हापासून तिला तिचे रहस्य लपविण्यास भाग पाडले गेले आहे. उदाहरणार्थ, जुई तिचा आहार आलापबरोबर करू शकत नाही. जर तिने असे केले तर आलापच्या जीवाला धोका निर्माण होईल. दुर्दैवाने, आलाप आणि जुई एकत्र होते तेव्हा त्याने तिच्या चॉकलेटचा चावा घेतला आणि तो बेशुद्ध पडला. आता, जुई आणि तिचे पालक आलापला पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, तेव्हा त्याचे कुटुंब जुईच्या दारात येऊन धडकतात. जुई आलापच्या कुटुंबास रोखू तर शकणार नाही परंतु तिचे रहस्य इतरांपासून लपून राहू शकेल काय?

प्रेम पॉइजन पंगाचा भाग पाहा:

आलाप फरशीवर कोसळल्यानंतर, जुईने स्वत:चे रहस्य धोक्यात आणत ती त्याला आपल्या घरी घेऊन येते. तिच्या आईने आलापला मदत करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. या दरम्यान जुईचे शेजारी तिच्या घरात येतात आणि त्यांनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांच्या औषधांनी देखील आलापला मदत केली नाही. आता, जुईच्या वडिलांना आलापचा जीव वाचवावा लागला आहे. ते सोल्यूशन्सचा विचार करीत असताना अलापचा भाऊ जुईच्या दारात येऊन धडकतो. ह्या सर्व गोंधळामध्ये, आलाप बरेच दिवसांपासून दूर होता हे प्रत्येकजण विसरला.

आलापच्या कुटूंबातील कुणालाही जुई आणि तिच्या कुटूंबाची दुसरी बाजू माहिती नसल्यामुळे आलापच्या भावाला घरात ठेवणे धोकादायक आहे. हा उत्कंठा वाढवणारा भाग पाहिल्यानंतर, आलाप शुद्धीवर येतो कि नाही हे पाहण्याची आम्ही वाट पाहू शकत नाही. तुम्हाला काय वाटते पुढे काय होईल? खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार सांगा.

दरम्यान, अधिक मनोरंजनासाठी, आपल्यासाठी तयार केलेली खास दिवाळी मूव्ही प्लेलिस्ट पाहा फक्त ZEE5 वर.

Related Topics

Related News

More Loader