ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 28 नोव्हेंबर 2019 पूर्वावलोकन: नचिकेत आप्पांना वर्कआउटसाठी तयार करतो

Manjiri Shete

November 29, 2019

Entertainment

1 min

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेच्या आज रात्रीच्या एपिसोडमध्ये, मध्यरात्री भूक लागली म्हणून आप्पा उठतात आणि स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी स्वयंपाकघरात जातात. नचिकेत, सई आणि आजींना वाटते की त्यांच्या घरात दरोडेखोर घुसला आहे आणि ते आप्पांना मारहाण करण्यास सुरवात करतात. त्यांची चूक लक्षात आल्यानंतर नचिकेत आप्पांना त्यांच्या खोलीत घेऊन जातो आणि काही वेळेने तो तिथेच झोपी जातो. जखमी आप्पांवर लक्ष ठेवल्याबद्दल सई मेसेज करून नचिकेतचे आभार मानते. दुसऱ्या दिवशी, आजी आप्पांना व्यायाम करण्यास सांगतात, पण आप्पा त्यासाठी मनाई करतात.

शोचा नवीनतम भाग पहा:

डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, आप्पांना वर्कआउट करणे गरजेचे असल्यामूळे नचिकेत एक युक्ती लढवतो. या युक्तीनुसार सईची आई गरमगरम भजी बनवते. आप्पांना भाजीबाबत कळताच त्यांच्या तोंडाला पाणी सुटते, परंतु भजी खाण्याआधी त्यांना व्यायाम करावा लागतो.

पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा. अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

Related Topics

Related News

More Loader