ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 27 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा व्यायाम करू इच्छित नाहीत

Manjiri Shete

November 28, 2019

Entertainment

1 min

zeenews

ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेतील एपिसोडमध्ये, आप्पा मध्यरात्री स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी तळमळतात. सर्वजण झोपलेले असताना ते खाण्यासाठी लपून-छापून स्वयंपाकघरात जातात. या शोधाशोधीत, डब्याचे झाकण खाली पडते आणि त्याने सर्वांना जाग येते. नचिकेत, आजी आणि सई विचार करतात की घरात दरोडेखोर तर शिरला नाही ना? नचिकेत दरोडेखोराला पकडण्यासाठी ब्लँकेट आणि झाडू सोबत घेतो. त्याच्या मागे आजी आणि सई आहे. चोर समजून आप्पांवरच ब्लँकेट टाकून नचिकेत त्यांना झाडूने मारू लागतो.

शोचा नवीनतम भाग पहा:

चोप खाताना आप्पा मोठमोठ्याने ओरडत आहेत. नंतर सर्वांना कळते कि हा आवाज घरातीलच ओळखीच्या माणसाचा आहे. वेदनांनी ओरडणाऱ्या आप्पांची नचिकेतने माफी मागितली. आप्पा आपल्या कुटुंबियांना समजावून सांगतात की ते झोपेतच चालू लागले पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. मग, नचिकेत आप्पांना त्यांच्या खोलीत घेऊन जाण्याची तयारी दाखवतो आणि तिथेच झोपतो. आप्पांच्या घोरण्याने नाचिकेतला झोप लागत नाही. मग नचिकेत आणि सई एकमेकांना मजकूर पाठवण्यास सुरवात करतात. आप्पाची काळजी घेण्याबद्दल सई नचिकेतचे आभार मानते.

दुसर्‍या दिवशी सकाळी, आजी आप्पांना हर्बल कंकोक्शन देतात. गेल्या काही वर्षांमध्ये आप्पा निरोगी राहिल्याबद्दल केतकर कुटुंबाने या हर्बल कंकोशचे आभार मानले. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आप्पांना व्यायाम करणे सक्तीचे आहे, आप्पांनी व्यायाम करावे म्हणून आजी आणि काका त्यांना विनवणी करतात. पण आप्पा त्यांच्याशी नीट बोलत नाही. नंतर आप्पा काकांना सांगतता की व्यायामाची खरी गरज मला नसून त्यांना आहे. आजीला आजोबांची काळजी वाटते आणि यातून मार्गग काढण्यासाठी ती विचार करते.

पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा. अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

Related Topics

Related News

More Loader