ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 25 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: आप्पा नचिकेतला खूप त्रास देतात

Manjiri Shete

November 26, 2019

Entertainment

1 min

zeenews

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या एपिसोडमध्ये, नचिकेत जेव्हा आप्पांना घरी घेऊन येतो तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घाबरून जातात. ते संपूर्ण घटनेचा नचिकेतला
आढावा देण्यास सांगतात. चिंतीत, घाबरलेला नचिकेत स्वतःला सावरत प्रामाणिकपणे घडलेल्या घटनेचे वर्णन करतो. दरम्यान आप्पा आपल्या बेडरूम मधून दुखापत झाल्याचे भासवत आहे. नचिकेतला त्रास होईपर्यंत हे असे नाटक चालू ठेवण्याची त्यांची योजना आहे. डॉक्टर सांगतात की आप्पांचा पाय काही फ्रॅक्चर झालेला नाही. आप्पा त्यांच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात परंतु डॉक्टर त्यांच्या निदानावर ठाम आहेत. मग, आप्पा आरडा-ओरड आणि गोंधळ घालण्यास सुरवात करतात, परंतु कोणीही फारसे लक्ष देत नाही. डॉक्टर औषधे लिहून देतात आणि केतकर कुटुंबाला ती औषध आप्पांना वेळेवर देण्यास सांगतात. आप्पांना सक्रिय राहण्याची, हालचाल करण्याची सूचनाही त्यांनी केली.

शोचा नवीनतम भाग पहा:

डॉक्टर जाताच, आजी आपल्या सुनेला सांगातत की त्यांनी सर्वानी नचिकेतच्या मदतीसाठी त्याचे आभार मानले पाहिजेत. जर नचिकेत नसता तर आप्पांची अवस्था खूपच बिकट झाली असती. नंतर , प्रत्येकजण आप्पांच्या बेडरूममध्ये जाऊन त्यांच्या शेजारी बसतात. आप्पा आपल्या कुटूंबाला त्यांच्या हातापायांना मालिश करायला सांगतात. आप्पांनी अप्रत्यक्षपणे इशारा केला की नचिकेतने त्यांचा पायाला मालिश करायला हवे कारण तो हे अधिक व्यवस्थितपणे करू शकेल. हे ऐकून नचिकेत आप्पांची सुश्रुषा करतो.

तो आप्पांच्या पायांना मालिश करीत असताना, आप्पा सतत नचिकेतला काही ना काही बोलून दोषी ठरवतात. आप्पांच्या मागण्या नचिकेतकडून अधिक वाढू लागतात. दरम्यान, आप्पांनी नचिकेतला आपल्या जवळ बसू दिल्याचे पाहून केतकर कुटुंबातील प्रत्येकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा. अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

Related Topics

Related News

More Loader