ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 21 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: डीग्स केतकरांच्या बचावासाठी धावत आला

Manjiri Shete

November 22, 2019

Entertainment

1 min

zeenews

आज रात्रीच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्णच्या एपिसोडमध्ये केतकर कुटुंब आणि नचिकेत एकत्र मिळून धिंगाणा घालत आहेत, मजा-मस्ती करत आहेत. यादरम्यान, आप्पा आणि आजी घरी परतण्याच्या मार्गावर आहेत. आजी घाबरल्या आहेत कारण लवकर घरी पोहचलो तर आप्पांना सर्वजण मजा मस्ती करताना दिसतील आणि मग सर्वच खेळखंडोबा होईल. आणि म्हणून आजी थोडा उशीर करण्याचा प्रयत्न करतात. पण आप्पा आजीचे आजिबात ऐकत नाहीत. त्या दोघांना परतीच्या मार्गावर पाहताच डिंग्स केतकर कुटुंबाला लगेच सूचित करतो. तसेच आप्पा घरात प्रवेश करताच सई नचिकेतला मराठी शिकवत आहे असा आव आणेल असं ठरतं.

शोचा नवीनतम भाग पहा:

आपल्या कुटूंबाने कोणतेही नियम तोडले नाहीत हे पाहून आप्पांना आनंद झाला आणि आजीला हायसे वाटते. प्रवासात थकल्यामुळे आप्पा त्यांच्या खोलीत आरामाकरिता गेल्यावर, आजी सर्वाना आप्पांचे धोती प्रकरण सांगते तर त्यांच्या अनुपस्थितीत केतकर कुटुंबात जी धमाल उडाली हे आजींना सांगितले जाते. तेव्हा सर्वजण भरपुर हसतात. नचिकेत आजीला सांगतो की त्यांचे संपूर्ण कुटुंब किती प्रतिभावान आहे. दरम्यान, डिग्स आप्पांच्या बेडरूमध्ये लपला आहे. तो बेडरूममधून हळूच बाहेर पडत असताना आप्पा त्याला बघतात आणि तो एक लुटारु आहे असा त्यांचा समज होतो. प्रत्येकजण सावध होतात आणि आप्पांच्या बेडरूममध्ये पोहचतात.

नचिकेत पटकन आप्पाला सांगतो की जेव्हा ते येथे पोचलले तेव्हा डिग्स झोपायला चालला होता, त्याच्यामुळे कुणाचेही नुकसान होणार नाही. आप्पा वगळता केतकर कुटुंब डिग्सच्या उपस्थितीने आश्चर्यचकित होण्याचे ढोंग करतात. मग, नचिकेत डिग्सला बाहेर घेऊन येतो आणि आप्पा झोपायला जातात. नंतर, सईच्या काकांनी नाचिकेतला सईच्या कवितांचे भाषांतर करण्यास मदत केली. त्या बदल्यात नचिकेत चिनूसाठी एक स्टोरीबुक आणतो आणि काकांना चिनूला तुमच्यासोबत झोपू द्या म्हणून सांगतो. अशाप्रकारे, काका आणि काकूंना स्वत:साठी एक खोली मिळू शकेल.

पुढच्या भागात काय होईल असे तुम्हाला वाटते? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

Related Topics

Related News

More Loader