ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण 12 नोव्हेंबर 2019 लेखी अपडेट: सई आणि नचिकेतला अवघडल्या सारखे वाटते

ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये, सई नचिकेतला मराठी शिकवत असताना ती त्याला रोजलींनबद्दल खोटे का बोललास म्हणून विचारते. त्याला काय बोलावे हे कळत नाही.

Manjiri Shete

November 13, 2019

Entertainment

1 min

zeenews

आज रात्रीच्या ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण एपिसोडमध्ये आप्पा धोत्रे यांना सतत फोन करत वकीलाचा नंबर विचारत आहेत. वकील धोत्रे यांचे नातेवाईक आहेत. ते आप्पाला जमिनीचा प्रश्न सोडवण्यास मदत करणार आहेत. यामुळे नचिकेतला घराबाहेर काढण्यास आप्पाला मदत होईल. वकिलाने आप्पाला त्यांची समस्या सोडवण्याचे वचन दिले. दरम्यान, आजीला मनी बॉक्स मिळतो ज्यातून नचिकेतने आप्पाला जेवणासाठी देय रक्कम दिली होती. नचिकेतला ज्या पद्धतीने वागणूक केली जात आहे, ते आजीला बघवत नाही. आजी हे कबूल करते की आप्पा नचिकेतला ज्या पद्धतीने वागणूक देतात त्यापेक्षा पशूंना चांगली वागणूक मिळते.

शोचा नवीनतम भाग पाहा!

सई नचिकेतला मराठी शिकवत आहेत. तो तीला वेगवेगळ्या मराठी म्हणींचा अर्थ विचारत आहे. जरी नचिकेत अर्थ समजून घेण्यास सक्षम असला, तरी इंग्रजी भाषेचा उपयोग न करता तो समजलेला अर्थ समजावून सांगण्यास सक्षम नाही. सई नचिकेतला मराठी आणि इंग्रजीची भेळ कारण्यापासून रोखते. या दरम्यान, आप्पा येऊन नचिकेतचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते नचिकेतला सांगतात की तो इतक्या सहज मराठी शिकू शकणार नाही. तथापि, नचिकेत सकारात्मक आहे.

आप्पाबरोबरच्या भेटीनंतर नचिकेत रागाने आपल्या मित्रांकडे जातो. तो त्यांच्याकडे आप्पा नकारात्मक व्यक्ती असल्याची तक्रार करतो. त्याने आपल्या मित्रांकडे कबूल केले की सईसाठी तो आप्पाला सहन करतोय कारण तिच्या आजोबांचा अनादर होत आहे हे तिला आवडत नाही. दरम्यान, रात्री सई आणि नचिकेतचा अभ्यास सुरू असताना तिचे कुटुंब नचिकेतचे लाड पुरवण्यासाठी सत्रामध्ये सतत व्यत्यय आणत असतात. जेव्हा ते दोघे एकटे असतात तेव्हा सई नचिकेतला विचारते की तो तिच्याशी रोजलींनबद्दल का खोटे बोलला. तो भडकतो आणि उत्तर देत नाही. नचिकेत सईला प्रपोज करण्याविषयी विचार करतोय, पण तो तसे करत नाही.

तुम्हाला काय वाटतं, पुढच्या भागात काय होईल ? आम्हाला खाली टिप्पण्यांमध्ये आपले विचार कळवा.

अधिक मनोरंजनासाठी लोकप्रिय मराठी मालिका आणि नवीन चित्रपट पाहा फक्त ZEE5 वर.

Related Topics

Related News

More Loader